फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणजेच Executive Trainee पदासाठी 400 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीची खासियत म्हणजे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांना अर्जाची अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी तयारीला लागा. एकंदरीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे. याच कालावधीत अर्ज शुल्कही भरावे लागेल.
उमेदवारांना काही अटी शर्ती पात्रता निकष म्हणून पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत. या भरती प्रक्रेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे GATE 2023, GATE 2024 किंवा GATE 2025 मधील वैध स्कोअर असणे अनिवार्य आहे. GATE 2022 किंवा त्यापूर्वीचे स्कोअर मान्य करण्यात येणार नाहीत. NPCIL कडून स्पष्ट करण्यात आले आहे की, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची निवड GATE स्कोअरच्या आधारे शॉर्टलिस्ट करून केली जाईल. हे शॉर्टलिस्टिंग 1:12 या गुणोत्तरानुसार केले जाईल, म्हणजेच एका जागेसाठी 12 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाईल.
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक, महिला उमेदवार तसेच NPCIL कर्मचारी यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. शुल्काचे पेमेंट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI च्या माध्यमातून ऑनलाइन करता येईल.
NPCIL कडून सांगण्यात आले आहे की, कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, पदोन्नतीच्या संधी, तसेच कौशल्यविकासासाठी प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे उमेदवारांना करिअरमध्ये चांगली प्रगती करता येईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना नीट वाचून सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.