फोटो सौजन्य: iStock
आयपीएल 2025 लवकरच सुरु होणार आहे. यंदाच्या ऑक्शनमध्येही अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळाले. या मेगा ऑक्शनमध्ये 180 पेक्षा जास्त खेळाडूंवर तब्बल कोटी रुपयांची बोली लागली. तर दुसरीकडे काही मोठे खेळाडू अनसोल्ड देखील राहिले. आयपीएल हे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट प्रीमियर लीगपैकी एक आहे. या लीगमधून अनेक जण बक्कळ पैसा कमावत असतात. त्यातीलच एक म्हणजे चिअरलीडर्स.
एखाद्या मॅचमध्ये जेव्हा फलंदाज चौकार किंवा षटकार मारतो तेव्हा चिअरलीडर्स तो क्षण साजरा करण्यासाठी नाचत असतात. यावेळी अनेक तरुणांचे मनोरंजन देखील होते. काही तरुणमंडळी तर त्या चिअरलीडर्सच्या प्रेमात देखील पडतात. पण अनेकदा असाही विचार मनात येतो की या चिअरलीडर्सना किती पैसे मिळत असावे. जर हा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला याचे उत्तर जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिअरलीडर्सना एका मॅचसाठी 15 ते 25 हजार रुपये मिळतात, जो अनेक जणांचा मासिक पगार असतो. आयपीएलमधील चिअरलीडर्सना सर्वाधिक मानधन कोलकाता नाईट रायडर्सकडून दिले जाते. ही टीम चिअरलीडर्सना प्रत्येक मॅचसाठी 25 हजार रुपये देते. मुंबई आणि आरसीबी चिअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 20 हजार रुपये देतात. एवढेच नाही तर मॅच जिंकणाऱ्या टीमच्या चिअरलीडर्सना बोनस देखील मिळतो.
PM Internship योजनेची 2 डिसेंबरला होणार सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार तरुणांशी संवाद
आयपीएलमध्ये चिअरलीडर्सचे खूप महत्व आहे. 2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाकी तेव्हा परदेशी चीअरलीडर्सचा यात समावेश करण्यात आला. फॅन्स आणि खेळाडूंचे मनोबल वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. परंतु, कालांतराने, चिअरलीडर्स आयपीएलचा एक महत्त्वाचा भाग बनल्या.
मॅचदरम्यान, चिअरलीडर्सच्या डान्स मूव्ह आणि परफॉर्मन्स प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. खासकरून विदेशी चिअरलीडर्सची आकर्षक स्टाइल फॅन्समध्ये चर्चेचा विषय असते. स्पर्धेतील प्रत्येक संघ आपल्या चिअरलीडर्सना खूप महत्त्व देताना दिसतो. आयपीएलच्या भव्यता आणि ग्लॅमरमध्ये चिअरलीडर्सचे योगदान नाकारता येणार नाही. यामुळे मॅच रोमांचक तर होतातच, पण लोकांचा क्रिकेटशी संबंधित उत्साहही वाढतो. यामुळेच चिअरलीडिंगचे प्रोफेशन दरवर्षी नवीन उंची गाठत आहे.
Government Job: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 800 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु
चिअरलीडिंगचा इतिहास खूप रंजक आहे. हे प्रोफेशन सर्वात पहिले अमेरिकेत सुरू झाले. सुरुवातीला, अमेरिकन फुटबॉल मॅचदरम्यान टीम्सना प्रोत्साहन देण्यासाठी चिअरलीडर्सचा वापर केला जात असे. विशेष म्हणजे आज चिअरलीडिंगचा संबंध महिलांशी जोडला जात असला तरी पूर्वी या प्रोफेशनमध्ये फक्त पुरुष चिअरलीडर्स असायचे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, 1898 मध्ये चीअरलीडर्स पहिल्यांदा फुटबॉल मॅचदरम्यान दिसले होते. त्यावेळी पुरुष चिअरलीडर्स टीम्सना चिअर करत असत. ही परंपरा 1923 पर्यंत चालूच होती.