Photo redit- Social Media ( काँग्रेसच्या संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदींचा खास प्लॅन)
केद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या PM इंटर्नशिप योजना (PMIS) 2024 साठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. पहिला नोेंदणीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या योजनेद्वारे इंटर्नशीप मिळालेल्या काही निवडक तरुणांशी पंतप्रधान नरेंद्र मोधी हे 2 डिंसेबर 2024 रोजी संवाद साधणार आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे हा संवादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
PM इंटर्नशिप योजना (PMIS) याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुलै 2024-25 चा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करताना केली होती, पीएमआयएस योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे अल्प उत्पन्र असलेल्या कुटुंबातील 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना 12 महिन्यांच्या इंटर्नशिपच्या संधी देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये प्रदान करण्याचे आहे. या योजने अंतर्गत तरुणांना 5,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत या योजनेद्वारे देशातील एक कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. तसेच, या योजनेत सहभागी होईल तरुणांना आर्थिक सहाय्य म्हणून 6,000 रुपये एकरकमी अनुदान देखील दिले जाईल.
केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाला ही योजना सुलभ करण्याचे काम देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार योजने अंतर्गत निवडलेल्या इंटर्न्सना ऑफर लेटर दिली जात आहेत. काही तांत्रिक अडचणी होत्या, ज्यांचे निराकरण जलदगतीने केले जात आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 1.85 अर्ज
पीएमआयएस ( PMIS) योजनेसंबंधी इंटर्नशीप नोंदणी ही 3 ऑक्टोबर सुरू झाली. तेव्हापासून PMIS पोर्टलला सुमारे 1.85 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा पहिला टप्पा 15 नोव्हेंबरला पूर्ण झाला. आता नोंदणीचा दुसरा टप्पा हा डिसेंबरमध्ये सुरु होणार आहे. योजनेसंबंधी पोर्टल सुरू झाले असताना, त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. पुढील टप्प्यात अर्जांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएम इंटर्नशिप योजना ( PIMS)
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी पीएम इंटर्नशिप योजना देशातील तरुणांना शिकण्यासोबत कमावण्याची संधी देते. या योजनेंतर्गत, तरुणांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये कौशल्य शिकता येऊ शकते आणि त्याबरोबर त्यांना दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड आणि 6,000 रुपयांची एकरकमी आर्थिक मदत देण्याची तरतूद केली गेली आहे. या योजनेचा दीर्घकालीन उद्देश हा पुढील पाच वर्षांत देशातील 1 कोटी तरुणांना देशातील 500 आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.
आयआयटी किंवा आयआयएमसारख्या उच्च संस्थांमध्ये शिकणारे तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA सारखी पात्रता असलेले उमेदवार पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंटर्नशिपच्या संधीसाठी अर्ज करू शकत नाहीत. कुटुंबाचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2023-24 साठी 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र नाही. केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये कौशल्य, प्रशिक्षणार्थी किंवा विद्यार्थी प्रशिक्षणात भाग घेणारे उमेदवार देखील पात्र असणार नाहीत.