Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससून रुग्णालयात, कर्मचाऱ्यांची भरती! अर्ज करण्यासाठी फक्त ८ दिवसांची मुदत

मुंबईत नोकरीच्या संधी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ससून रुग्णालयात भरतीला सुरुवात झाली आहे. ८ दिवसांच्या आत ही भरती राबवण्यात येणार असून ७०० पेक्षा अधिक उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2025 | 05:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत कामाच्या संधीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ससून रुग्णालयात अर्ज करता येणार आहे. ससून रुग्णालयात भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांना भरण्यासाठी या भरतीला सुरु करण्यात आले आहे. मुळात, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना फक्त ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या भरतीला सुरुवात करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले. या भरतीच्या माध्यमातून एकूण ७८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीला सुरुवात करण्याची मागणी आमदार सुनील कांबळे यांच्याद्वारे करण्यात आली होती.

DU मध्ये नॉन-टीचिंग पदांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

ससून रुग्णालयात भरतीसाठी एकूण २,३५० जागा मंजूर करण्यात आले असून या पदांपैकी एकूण ७८९ पदे रिक्त आहेत. यातील ५०% जागा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदासाठी आहे. तर एकूण १६० उमेदवारांना परिचारकांच्या पदासाठी नियुक्त केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे चतुर्थश्रेणी कामगारांची भरती ‘टीसीएस’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाने करावी, असा आदेश देण्यात आला आहे. या भरतीच्या प्रक्रियेला अजून सुरुवात जरी झाली नसली तरी येत्या ८ दिवसांत भरतीची प्रक्रिया संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रुग्णालयाला येत्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाला आहे. नुकतेच ₹१२.९४ कोटींची औषध खरेदी करण्यात आली. नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणीदेखील करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागातून खासकरून पश्चिम महाराष्ट्रातून अनेक रुग्ण ससूनमध्ये उपचार घेण्यासाठी येतात. पण आल्यानंतर त्यांना आरोग्य सेवेत तसेच इतर पायाभूत सुविधांमध्ये कमतरता जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

नागपूरमध्ये पतंजली मेगा फूड पार्क सुरू; १० हजारांहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी

वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रिया साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत आहे. आपत्कालीन आणि सर्जरी विभाग योग्य प्रकारे कार्यरत नाही. अशा कारणांमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेच्या बाबतीतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व समस्यांवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले आहे. स्वच्छतेच्या कामाची तपासणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Web Title: Sassoon hospital recruitment of staff only 8 days left to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Sasoon Hospital

संबंधित बातम्या

ससूनमध्ये भरती कसून! जाहिरात जाहीर, दवडू नका वेळ… करा अर्ज, व्हा नियुक्त
1

ससूनमध्ये भरती कसून! जाहिरात जाहीर, दवडू नका वेळ… करा अर्ज, व्हा नियुक्त

ससून हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, तपासात सुरक्षारक्षकाचा धक्कादायक उलगडा
2

ससून हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, तपासात सुरक्षारक्षकाचा धक्कादायक उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.