Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SAVWIPL : पुण्यातील बाणेर येथे नवीन टेक्नॉलॉजी सेंटर विंग! विकास क्षेत्रात कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत

स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील बाणेर येथे नवीन टेक्नॉलॉजी सेंटर विंगचे उद्घाटन केले. या विस्तारामुळे संशोधन व विकास क्षेत्रात कंपनीची उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 01, 2026 | 06:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) ने पुण्यातील बाणेर येथे टेक्नॉलॉजी सेंटर पुणे (टीसीपी) च्या नवीन विंगचे उद्घाटन करत संशोधन आणि विकास क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. या विस्तारामुळे स्थानिक अभियंता प्रतिभेला चालना मिळणार असून भारतीय बाजारपेठेतील बदलत्या गरजांना अधिक वेगाने प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. तसेच जागतिक स्तरावर स्केलेबिलिटी साधण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. कंपनीच्या ‘मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड’ या धोरणाला यामुळे अधिक बळ मिळणार आहे.

“मिसिंग लिंक नव्हे, ही तर…”; नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला, प्रवाशांची माफीही मागितली

बाणेर येथील ही अत्याधुनिक सुविधा सुमारे ३३,००० चौरस फूट क्षेत्रफळावर उभारण्यात आली असून पुणे शहरातील प्रमुख आणि वेगाने विकसित होत असलेल्या भागात स्थित आहे. या केंद्रामध्ये प्रगत वाहन विकास, प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर सोल्यूशन्स तसेच शाश्वत मोबिलिटी इनोव्हेशन्सवर विशेष भर दिला जाणार आहे. ही नवीन विंग चाकण येथील उत्पादन प्रकल्पाला पूरक ठरणार असून कंपनीच्या एकूण अभियंता संख्येत वाढ होऊन ती ४५० पेक्षा अधिक होणार आहे. हे अभियंते देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी असतील.

फॉक्सवैगन ग्रुपच्या जागतिक संशोधन आणि विकास नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ही सुविधा ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ या संकल्पनेनुसार कार्य करणार आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजांचा सखोल अभ्यास करून जागतिक दर्जाचे नवोन्मेष विकसित करण्यावर कंपनीचा भर राहणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिकीकरणाला चालना मिळेल, निर्यात बाजारपेठांना बळकटी मिळेल आणि गुणवत्ता, सुरक्षा तसेच तांत्रिक मानदंडांचे पालन अधिक प्रभावीपणे करता येईल.

या घोषणेबाबत बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियूष अरोरा यांनी सांगितले की, पुण्यातील आरअँडडी विस्तार हा भारतातील कंपनीच्या वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाणेरमधील नवीन विंगमुळे शहरी भागात अतिरिक्त क्षमता निर्माण होत असून चाकणमधील टेक्नॉलॉजी सेंटरच्या भक्कम पायावर कंपनी पुढे जात आहे. डिजिटलायझेशन, ऑटोमेशन आणि प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य वाढवण्यावर कंपनी विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

२०१९ मध्ये स्थापन झाल्यापासून चाकणमधील टेक्नॉलॉजी सेंटर पुणे भारतीय ग्राहकांसाठी वाहन विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या केंद्राने फोक्सवैगन टाइगन, स्कोडा कुशाक आणि ग्रुपच्या सब-४ मीटर एसयूव्ही मॉडेल्सच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या नव्या विस्तारामुळे कंपनी स्थानिक प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवत आहे. एकूणच, बाणेर येथील नवीन टेक्नॉलॉजी सेंटरमुळे भारतातील ऑटोमोबाईल संशोधन आणि विकास क्षेत्राला नवी चालना मिळणार असून कनेक्टेड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिफिकेशन आणि किफायतशीर इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: Savwipl new technology center wing in baner pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 06:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.