Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Clerk recruitment: एसबीआयकडून तब्बल ९,७६६ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या सविस्तर!

SBI Clerk recruitment 2026 official notification: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्लर्कच्या ९,७६६ रिक्त पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 12, 2026 | 02:50 PM
sbi

sbi

Follow Us
Follow Us:

SBI Clerk recruitment 2026 official notification: दहावी, बारावी किंवा अगदी पदवीपर्यंत (ग्रॅज्युएशन) शिक्षण घेणाऱ्या बहुतांश लोकांचे पहिले ध्येय सरकारी नोकरी मिळवणे असते. सरकारी नोकरी मिळावी म्हणून ते विविध परीक्षांमध्येही सहभागी होतात. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत आहेत आणि सरकारी बँकेत रिक्त जागा निघण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘भारतीय स्टेट बँक’ ने क्लर्क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.

एसबीआय क्लर्क ९,७६६ रिक्त पदांवर भरती

एसबीआयच्या भरती अधिसूचनेनुसार, एकूण ९,७६६ रिक्त पदांच्या भरतीमध्ये ७,६८० नियमित (रेगुलर) पदे आणि २,०८६ बॅकलॉग पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ११ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज करण्यासाठी विंडो खुली राहणार आहे. अर्ज करण्यापूर्वी कोणत्या राज्यामध्ये किती रिक्त जागा आहेत, हे एकदा नक्की तपासून घ्या.

एसबीआय क्लर्क पदांनुसार राज्यनिहाय रिक्त जागा

राज्य रेग्युलर पदे बॅकलॉग पदे
महाराष्ट्र १,७१८ २८१
तमिळनाडु १,४१० १०६
ओडिशा १,१०० १८
कर्नाटक ७६० ३९५
पश्चिम बंगाल ५५५ १४९
उत्तर प्रदेश २५० ३०७
गुजरात ३३० ३०५
राजस्थान ३५० ७५

भारतीय स्टेट बँकेने क्लर्कच्या रिक्त पदांची विभागणी छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, लद्दाख, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली आहे. याशिवाय जनरल, ओबीसी, एससी, एसटी अशा प्रवर्गांनुसारही पदांची भरती केली जाईल.

Independence Day: लाल किल्ल्यावर इतिहासात प्रथमच घडणार मोठी घटना; पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी गायले जाणार ‘हे’ गीत!

प्रवर्गनिहाय उमेदवारांसाठी किती पदे रिक्त?

सामान्य वर्ग : ३,२५३ पदे

ओबीसी : १,७१६ पदे

एससी : १,११४ पदे

एसटी : ८३७ पदे

इब्ल्यूएस : ७६० पदे

एसबीआय क्लर्क भरती २०२६ बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही थेट लिंकवर क्लिक करू शकता. लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात, तेथील स्थानिक भाषा बोलता आणि लिहिता आली पाहिजे.

कोण अर्ज करू शकते?

एसबीआय क्लर्क भरती २०२६ अंतर्गत कोणत्याही शाखेतून पदवी (बॅचलर डिग्री) उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादेचा विचार केला तर, किमान वयोमर्यादा २० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.

Government School: एका वर्षात देशात १० हजारांहून अधिक प्राथमिक शाळा घटल्या; लोकसभेत समोर आलेले धक्कादायक आकडे एकदा बघाच…

एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज कसा करावा?

1. सर्वात प्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला sbi.bank.in भेट द्या.

2. होमपेजवर ‘Careers’ सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

3. त्यानंतर वर दिलेल्या पर्यायांमध्ये ‘Join SBI’ वर क्लिक करा.

4. नंतर ‘Current Openings’ वर क्लिक केल्यानंतर ‘SBI Clerk Notification 2026’ दिसून येईल.

5. जर ते दिसत नसेल तर तुम्ही सर्च करू शकता किंवा थेट लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकता.

6. ‘Apply Now’ वर क्लिक केल्यानंतर सर्व आवश्यक तपशील भरा आणि फॉर्म सबमिट करा.

7. अर्ज सादर केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची पीडीएफ (PDF) डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा.

Web Title: Sbi clerk recruitment 2026 9766 vacancies news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • SBI Bank

संबंधित बातम्या

Destroyed Cash : 5 लाखांच्या नोटा किड्यांनी कुरतडल्या, बँकेनेही बदलण्यास दिला नकार? नेमका काय आहे नियम?
1

Destroyed Cash : 5 लाखांच्या नोटा किड्यांनी कुरतडल्या, बँकेनेही बदलण्यास दिला नकार? नेमका काय आहे नियम?

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! ‘एसबीआय क्लर्क’ पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज?
2

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! ‘एसबीआय क्लर्क’ पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज?

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा
3

SBI Q1 Results: स्टेट बँकेचा मोठा गल्ला, केली छप्परफाड कमाई! पहिल्या तिमाहीत 21121 कोटी रुपयांचा बंपर नफा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.