फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Independence Day 2026 : या वर्षी १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला जाईल. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतील. मात्र, यंदाचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे, कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी राष्ट्रीयगीत ‘वंदे मातरम्’ गायले जाईल. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पारंपरिक प्रोटोकॉलमधील या मोठ्या बदलाची घोषणा १० ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र/संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केली.
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत गाण्याचा हा निर्णय ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या उपलक्ष्यात घेण्यात आला आहे. तथापि, भारतात याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळून सुमारे ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज आपण वंदे मातरम् कोणी लिहिले? राष्ट्रगीत कधी लिहिले गेले होते? संविधान सभेने वंदे मातरम्ला राष्ट्रगीताचा दर्जा कधी दिला? हे जाणून घेणार आहोत.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पारंपरिक राजशिष्टाचारांनुसार, पीएमच्या आगमनानंतर ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जातो, त्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि २१ तोफांची सलामी दिली जाते आणि नंतर राष्ट्रगीत – जन गण मन नंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात, परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. १८७६ मध्ये रचलेले ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राष्ट्र संबोधनापूर्वी गायले जाणार आहे.
वर्ष १८७६ मध्ये ‘वंदे मातरम्’ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी) यांनी रचले होते. हे राष्ट्रगीत त्यांच्या प्रसिद्ध ‘आनंदमठ’ या कादंबरीच्या माध्यमातून प्रकाशित झाले होते. १८८२ मध्ये या कादंबरीत वंदे मातरम् गीत प्रकाशित झाले.
१५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर वंदे मातरम् गायले जाईल. भारतात राष्ट्रगीताचा दर्जा मिळण्यापूर्वी १८७६ दरम्यान लिहिलेले वंदे मातरम् हे एक गीत म्हणून ओळखले जात होते. १८८२ मध्ये त्यांच्या प्रसिद्ध ‘आनंदमठ’ कादंबरीत वंदे मातरम् प्रकाशित झाले, पण राष्ट्रीय गीताच्या स्वरूपात त्याला नंतर दर्जा मिळाला. संविधान सभेत २४ जानेवारी १९५० रोजी वंदे मातरम् गीताला अधिकृतपणे राष्ट्रीयगीताचा दर्जा देण्यात आला होता. तर, ‘जन गण मन’ ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळालेला आहे.
वंदे मातरम् ची रचना करणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म २७ जून १८३८ रोजी उत्तर २४ परगणाच्या कांथलपाडा येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांना केवळ देशाला राष्ट्रगीत देणारेच नव्हे, तर बांगला साहित्याचे एक प्रख्यात कादंबरीकार म्हणूनही ओळखले जाते. ते एक कुशल कवी आणि पत्रकारही होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ गीत क्रांतिकारकांसाठी उर्जा आणि प्रेरणेचा सर्वात मोठा स्त्रोत बनले होते.






