
sbi
SBI Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (SBI) डिजिटल मार्केटिंग आणि संप्रेषण विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर विविध उच्च पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मोहिमेद्वारे ‘डिप्टी व्हाईस प्रेसिडेंट’ (अॅनालिटिकल मार्केटिंग अँड कॅम्पेन), ‘डिप्टी व्हाईस प्रेसिडेंट’ (डिजिटल मार्केटिंग) आणि ‘कंटेंट स्पेशालिस्ट’ या पदांची भरती केली जाणार असून एकूण ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, २१ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदवी, उच्च शिक्षण आणि आवश्यक अनुभव असणे अनिवार्य आहे. यामध्ये डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट पदांसाठी ३३ ते ४५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसेच कंटेंट स्पेशालिस्ट पदासाठी वयोमर्यादा २५ ते ४० वर्षे असून ५ ते ७ वर्षांचा अनुभव मागितला आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वार्षिक पॅकेज (CTC) दिले जाणार असून, नियुक्ती सुरुवातीला ३ वर्षांच्या कंत्राटावर असेल आणि बँकेच्या गरजेनुसार ती पुढे वाढविली जाऊ शकते.
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://sbi.bank.in/web/careers/current-openings) केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार असून, इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क नाही. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा