Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : स्थायी’च्या बैठकीत खडाजंगी; २४९ संगणक ऑपरेटर्सची गरज नेमकी किती ?

Nagpur News : नागपूर महापालिकेतील २४९ संगणक ऑपरेटरांच्या कंत्राटवाढीवर स्थायी समितीत जोरदार चर्चा झाली. १५.२० कोटींच्या खर्चासह कर्मचाऱ्यांची पात्रता, वेतन, पीएफ, ईएसआयसी आणि तीन वर्षांत वाढलेल्या ऑपरेटर संख्येवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 07, 2026 | 04:33 PM
Nagpur Municipal corporation

Nagpur Municipal corporation

Follow Us
Follow Us:
  • २४९ ऑपरेटरांच्या पात्रतेची होणार पडताळणी?
  • दोन वर्षांसाठी १५.२० कोटींचा खर्च; वेतन आणि पीएफवर प्रश्न
  • तीन वर्षांत १५० वरून २४९ ऑपरेटर; वाढीमागचे कारण काय?
Nagpur News : नागपूर महापालिकेच्या विविध विभागांमध्ये संगणक ऑपरेटर पुरविणाऱ्या एजन्सीला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. तब्बल २४९ ऑपरेटरांच्या नियुक्तीशी संबंधित या प्रस्तावात कर्मचाऱ्यांची पात्रता, प्रत्यक्ष वेतन, एजन्सीचे सेवा शुल्क आणि कंत्राटाच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य अभिजित झा आणि वसीम खान यांनी प्रशासनाला धारेवर धरत नव्या कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली.

२४९ ऑपरेटरांच्या पात्रतेची होणार पडताळणी?

महापालिकेत संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता नेमकी काय आहे, असा महत्त्वाचा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. या पदासाठी पदवीधर असणे, एमएस-सीआयटी प्रमाणपत्र असणे, इंग्रजी टायपिंगचा वेग प्रतिमिनिट ३० ते ४० शब्द आणि मराठी टायपिंगचा वेग प्रतिमिनिट ३० शब्द असणे अपेक्षित आहे.

मात्र, नियुक्त करण्यात आलेल्या सर्व २४९ कर्मचाऱ्यांनी हे निकष पूर्ण केले आहेत का, याबाबत सदस्यांनी शंका व्यक्त केली. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची आणि टायपिंग कौशल्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. केवळ एजन्सीने कर्मचारी पुरविले म्हणून त्यांची नियुक्ती योग्य ठरत नाही, तर निर्धारित निकषांची पूर्तता झाली आहे का, याची खातरजमा प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.

Nagpur News: आता चक्क नागपूरमध्ये समुद्रकिनारा, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा देणार खास अनुभव

दोन वर्षांसाठी १५.२० कोटींचा खर्च; वेतन आणि पीएफवर प्रश्न

या प्रस्तावातील आर्थिक तरतुदीनेही सदस्यांचे लक्ष वेधले. प्रत्येक संगणक ऑपरेटरसाठी महापालिकेकडून दरमहा २५ हजार ४३५ रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. २४९ ऑपरेटर आणि दोन वर्षांचा कालावधी विचारात घेतल्यास हा खर्च सुमारे १५ कोटी २० लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. एवढ्या मोठ्या खर्चाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष किती वेतन जमा होते, एजन्सीला किती सेवा शुल्क मिळते, याचा स्पष्ट तपशील मागण्यात आला.

तसेच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (PF) आणि कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) रक्कम नियमानुसार जमा केली जाते का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. अभिजित झा आणि वसीम खान यांनी नव्या कंत्राटापूर्वी वेतन, सेवा शुल्क आणि आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील प्रशासनाने पारदर्शकपणे सादर करावा, अशी भूमिका मांडली.

Nagpur News : रुग्णालयापासून विमानतळापर्यंत पोहोचणे कठीण; पदयात्रेने शहर जाम

तीन वर्षांत १५० वरून २४९ ऑपरेटर; वाढीमागचे कारण काय?

महापालिकेत तीन वर्षांपूर्वी केवळ १५० संगणक ऑपरेटर कार्यरत होते. ही संख्या आता थेट २४९ वर पोहोचल्याने ऑपरेटरची गरज अचानक कशी वाढली, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. मागील दोन वर्षांतील कामकाजाचा तपशील आणि प्रत्येक विभागात किती ऑपरेटर कार्यरत आहेत, याची माहिती प्रशासनाकडून मागविण्यात आली. याशिवाय संबंधित एजन्सीच्या कंत्राटाची मुदत १० ऑक्टोबर रोजीच संपली होती.

असे असताना नवीन निविदा प्रक्रिया वेळेत का सुरू करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला. कंत्राटाची मुदत संपणार असल्याची पूर्वकल्पना प्रशासनाला असतानाही शेवटच्या क्षणी मुदतवाढीचा प्रस्ताव का आणण्यात आला, तसेच या विलंबाला जबाबदार कोण, याचे उत्तर मागण्यात आले. नव्या कंत्राट प्रक्रियेत अनियमितता होऊ नये आणि महापालिकेच्या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी सदस्यांनी केली.

Web Title: Nagpur news standing committee 249 computer operators contract controversy cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation

संबंधित बातम्या

Vandana Gupte: पहिला खून माझाच होईल!’ वंदना गुप्तेंच्या पतीचा मिश्कील टोला; बाळासाहेबांशी जोडलेला किस्सा चर्चेत
1

Vandana Gupte: पहिला खून माझाच होईल!’ वंदना गुप्तेंच्या पतीचा मिश्कील टोला; बाळासाहेबांशी जोडलेला किस्सा चर्चेत

Sourav Joshi Troll:  कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड
2

Sourav Joshi Troll: कंटेंटसाठी प्रायव्हसीचा विसर! गोव्यात पत्नीचा व्हिडिओ काढल्याने लोकप्रिय युट्यूबरवर टीकेची झोड

तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली निवेदनावरून वाद; अमोल मिटकरींची मंडळावर सडकून टीका!
3

तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली निवेदनावरून वाद; अमोल मिटकरींची मंडळावर सडकून टीका!

Pimple Gurav Murder: एका सिम कार्डमुळे १२ तासांत उलगडलं हत्येचं गूढ! कचऱ्याच्या पोत्यात आढळले पाय अन्…
4

Pimple Gurav Murder: एका सिम कार्डमुळे १२ तासांत उलगडलं हत्येचं गूढ! कचऱ्याच्या पोत्यात आढळले पाय अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.