
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त शिक्षण संस्था असलेल्या सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत मोफत करिअर ग्रोथ सेमिनार आयोजित करण्यात येत आहे. हा विशेष कार्यक्रम शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी ताज सांताक्रूझ, मुंबई येथे दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. प्रवेश मोफत असून पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.
या सेमिनारमध्ये नोकरीच्या शोधात असलेले युवक, पदवीधर, प्रारंभिक आणि मध्यम अनुभव असलेले व्यावसायिक, SCDL चे माजी विद्यार्थी आणि HR क्षेत्रातील पुढारी सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे तरुणांना योग्य दिशा देणे, विविध क्षेत्रातील संधींविषयी माहिती देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे.
कार्यक्रमाचे प्रमुख सत्र पुढीलप्रमाणे असणार आहेत:
SCDL ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी दूरशिक्षण संस्थांपैकी एक असून, २००१ पासून आजवर १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. ८०,००० पेक्षा जास्त सक्रिय विद्यार्थी, उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम, डिजिटल फर्स्ट शिकवण्याची पद्धत आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग ही या संस्थेची खासियत आहे. हे मोफत सेमिनार म्हणजे केवळ माहिती देणारे व्यासपीठ नाही, तर विद्यार्थ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीची एक संधी आहे.