भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी नुकताच आरोग्याच्या कारणास्तव तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राज्यसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. २०२२ मध्ये त्यांनी उपराष्ट्रपती या पदाची शपत घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. जगदीप धनखर हे देशाचे १४ वे उपराष्ट्रपती होते. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हा पद कोणाला देण्यात येईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला माहिती आहे का उपराष्ट्रपती पदाची निवड कशी होते? नाही, तर चला जाणून घेऊया.
पत्रात काय?
जगदीप धनकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहत राजीनामा दिला. “आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७ (अ) नुसार तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.” असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
उपराष्ट्रपतींची निवड कशी केली जाते?
भारतीय राज्यघटनेच्या कलम ६६ नुसार, उपराष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांद्वारे केली जाते. या इलेक्टोरल कॉलेजमध्ये राज्यसभेचे निवडलेले सदस्य, राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभेचे निवडलेले सदस्य असतात. इलेक्टोरल कॉलेजचे सर्व सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात, त्यामुळे प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य समान असते. निवडणूक आयोग, केंद्र सरकारशी सल्लामसलत करून, लोकसभा आणि राज्यसभेच्या महासचिवांना आलटून पालटून निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करतो. नियमांनुसार, ही निवडणूक संसद भवनात घेतली जाते आणि ती गुप्त मतदान पद्धतीने केली जाते.
भारताचे उपराष्ट्रपती कोण होऊ शकते?
संविधानानुसार, खालील पात्रता पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती भारताचे उपराष्ट्रपती होऊ शकते:
१. भारताचे नागरिक असणे.
२. वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
३. राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडणुकीसाठी पात्र असणे आवश्यक आहे.
४. केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या अंतर्गत कोणतेही लाभाचे पद धारण करू नये.
नवीन उपराष्ट्रपती कधी निवडले जातील?
भारत सरकारच्या मते, पुढील उपराष्ट्रपतीची निवडणूक उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वी झाली पाहिजे. मृत्यू, राजीनामा किंवा हकालपट्टी किंवा इतर कोणत्याही रिक्त पदाच्या बाबतीत, ती रिक्त जागा भरण्यासाठी शक्य तितक्या लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश आहेत.
कसा होता उपराष्ट्रपती जगदीप धनकारचा इथपर्यंतचा प्रवास?
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे अश्या तरुणांपैकी आहेत जे एका लहान गावातून येतात आणि त्यांच्या कठोर परिश्रम आणि शिक्षणाद्वारे मोठी उंची गाठतात. त्यांचा जन्म १८ मे १९५१ ला राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्यातील किठाना गावात झाला होता. त्यांना लहान पण पासून अभ्यासात रुची होती. त्यांचं प्राथमिक शिक्षण किठाना येथील सरकारी प्राथमिक स्कूल मध्ये झालं. त्यांनतर त्यांनी घरधना येथील सरकारी माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. १९६२ मध्ये त्यांनी चित्तोडगड सैनिक शाळेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि पूर्ण गुणवत्ता शिष्यवृत्तीवर प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी राजस्थान यूनिवर्सिटी जयपुर येथून आपलं
बीएससी(ऑनर्स) इन फिजिक्सची पदवी प्राप्त केली. त्यांनतर त्यांनी 1978-79 एलएलबीची पदवी प्राप्त केली.
त्यांनतर वकिली केली. १९९० मध्ये ते केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री देखील होते. १९९३-९८ मध्ये ते किशनगड येथून राजस्थान विधानसभेचे आमदार होते. २० जुलै २०१९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी धनखड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. ३० जुलै २०१९ रोजी त्यांनी कोलकाता येथील राजभवन येथे शपथ घेतली.11 अगस्त 2022 ला त्यांनी भारताचे 14वे उपराष्ट्रपति झाले.