Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

School Dropouts Survey Maharashtra: शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यभर विशेष सर्वेक्षण राबवले जाणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्याचे शिक्षण संचालकांचे निर्देश आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 27, 2026 | 03:06 PM
राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ

राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा; दहावी-बारावी परीक्षा शुल्क केले माफ

Follow Us
Follow Us:
  • राज्यभर पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम
  • शिक्षण संचालक शरद गोसावी यांचे सर्व जिल्ह्यांना निर्देश
  • एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षणावर भर
  • ‘या’ कारणामुळे बालके शिक्षणापासून दूर
School Dropouts Survey Maharashtra: शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यभर विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरात पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून जून आणि जुलै २०२६ मध्ये करण्यात आलेल्या शोधमोहिमेत तब्बल ८३१ शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत. या बालकांना शाळेत दाखल करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सर्वेक्षण राबविण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.

शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २३ जून २०२२च्या शासन निर्णयानुसार राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणात आढळणाऱ्या बालकांना त्यांच्या नजीकच्या शाळेत दाखल करून त्यांचे शिक्षण अखंडित ठेवण्यासाठी कार्यवाही केली जाते. मात्र, विविध कारणांमुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात बालके शिक्षणापासून दूर असल्याचे निदर्शनास आले आहे.

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!

‘या’ कारणामुळे बालके शिक्षणापासून दूर

बालके शिक्षणापासून दूर राहण्यापाठीमागे कौटुंबिक अडचणी, पालकांची आर्थिक परिस्थिती, शिक्षणाबाबतची अनास्था यांसह विविध कारणांमुळे काही बालके शाळेत दाखल होत नाहीत किंवा अनियमित राहतात. शहरांमधील रस्ते, रेल्वेस्थानके, एसटी बसस्थानके अशा ठिकाणीही शाळाबाह्य बालके आढळतात.

SBI Free Online Courses: करिअरला द्या नवी दिशा! SBI च्या ‘या’ फ्री ऑनलाईन कोर्सेसमधून मिळवा फायनान्सचे धडे

पोलिस प्रशासनाच्या सहकार्याद्वारे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात इतर शासकीय यंत्रणांसोबत पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.

Web Title: School dropouts special survey maharashtra education news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • education
  • maharashtra government school

संबंधित बातम्या

Indian Scientists: मर्यादित संसाधनांतून रचला इतिहास! जाणून घ्या भारतीय अंतराळ आणि अणुऊर्जेच्या ५ जनकांविषयी सविस्तर
1

Indian Scientists: मर्यादित संसाधनांतून रचला इतिहास! जाणून घ्या भारतीय अंतराळ आणि अणुऊर्जेच्या ५ जनकांविषयी सविस्तर

BBA vs BCom १२ वी नंतर कोणता कोर्स आहे बेस्ट? जाणून घ्या शिक्षण, करिअर आणि सॅलरी पॅकेजबद्दल सविस्तर
2

BBA vs BCom १२ वी नंतर कोणता कोर्स आहे बेस्ट? जाणून घ्या शिक्षण, करिअर आणि सॅलरी पॅकेजबद्दल सविस्तर

B.Com नंतर सरकारी बँकेत नोकरी कशी मिळवायची? जाणून घ्या आयबीपीएस आणि एसबीआय परीक्षांचे पास होण्याचे सोपे मार्ग
3

B.Com नंतर सरकारी बँकेत नोकरी कशी मिळवायची? जाणून घ्या आयबीपीएस आणि एसबीआय परीक्षांचे पास होण्याचे सोपे मार्ग

New Medical College in Delhi: खूशखबर! गुरु गोबिंद सिंह रुग्णालयात १५० MBBS जागांचे नवीन मेडिकल कॉलेज; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
4

New Medical College in Delhi: खूशखबर! गुरु गोबिंद सिंह रुग्णालयात १५० MBBS जागांचे नवीन मेडिकल कॉलेज; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.