फोटो सौजन्य - Social Media
भौतिक शास्त्रज्ञ प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांचे निधन झाले आहे. विज्ञान आणि गणितामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले विज्ञान आणि गणित क्षेत्रातील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी ओळखल्या जातात. त्यांचे प्रार्थमिक शिक्षण पुण्यातील हुजूरपागा या विद्यालयातून झाले.
शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी आणि भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकी विषयात पदवीधर होण्यासाठी प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांनी पुण्यातील परशुरामभाऊ महाविद्यालयाची निवड केली. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून पदवी मिळवत त्यांनी IIT मुंबईमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे त्यांनी न्यूयॉर्कच्या स्टोनि ब्रोक युनिव्हर्सिटीत पुढील शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रात प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले हे नाव फार मोठे आहे.
हे देखील वाचा : AIIMS मध्ये भरतीला सुरुवात; नागपूर संस्थानात ६२ पदांसाठी व्हॅकन्सी, गोरखपूरमध्ये १४४ पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती
प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांचे योगदान
प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांचा २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव केला गेला. इतकेच नव्हे तर त्यांना ‘नॅशनल अवॉर्ड ऑफ मेरिट’ या पुरस्कारने गौरविण्यातही आले. फ्रांस सरकारने त्यांचा गौरव केला होता. अशी अनेक पूरस्कार त्यांच्या नाव आहेत. मूलभूत कणांसाठी ‘स्टॅंडर्ड मॉडेल’ वापरले जात होते. पण, यावर प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले यांनी दाखवून दिले कि यासाठी फक्त ‘स्टॅंडर्ड मॉडेल’ पुरेसे नाही आहे. त्यांचे म्हणणे होते कि,” अँटीमीटरच्या अस्तित्वासाठी तसेच त्याविषयी आणखीन जाणून घेण्यासाठी नव्या विज्ञानाचा विचार करावा लागणार.”
पद्मश्री पुरस्काराचा मान
प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले या इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अध्यक्षा होत्या. हे एक विज्ञान उपक्रम होते. त्यांनी येथे महिलांसाठी अध्यक्षपद भूषवले होते. शेवटच्या काळात त्या IISC बंगलोरमध्ये संशोधनाचे कार्य बजावत होत्या. भारत सरकारने डॉ. रोहिणी गोडबोले यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानासाठी २०१९ साली पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. इतकंच नाही तर फ्रेंच सरकारकडूनही त्यांना Ordre National du Mérite हा फ्रान्समधील प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला होता.
काय होते संशोधन
Phd केल्यानंतर 3 वर्षे गोडबोले यांनी मुंबईत TIFR मध्ये काम केले होते तर त्यानंतर चार महिने मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि तब्बल 12 वर्षे मुंबई विद्यापीठात सुरुवातीला व्याख्याती आणि नंतर अधिव्याख्याती म्हणून काम केले असल्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. २०१९ या सालामध्ये प्रा. डॉ. रोहिणी गोडबोले या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू येथे काम होत्या आणि त्यांनी कण भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि कोलायडर भौतिकी या विषयांत चाळीसहून अधिक वर्षे संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.