Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहाजी नगर मनपा शाळेची राज्यभरात धमक; दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

शहाजी नगर हिंदी मनपा शाळेतील विवेक साकेत आणि संदीप पासवान यांनी राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड मिळवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 10, 2025 | 05:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यभरात शाळेचा आणि मुंबई पालिकेचा मान उंचावला
  • दोन्ही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी आता उपलब्ध झाली
  • कनिष्ठ पर्यवेक्षक किरण इंगळे यांनी अभिनंदन व्यक्त केले
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहाजी नगर हिंदी मनपा शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी किक बॉक्सिंग क्रीडाक्षेत्रात मोठी कामगिरी बजावत राज्यभरात शाळेचा आणि मुंबई पालिकेचा मान उंचावला आहे. या शाळेतील विवेक मोहनलाल साकेत आणि संदीप संतोष पासवान या दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून महाराष्ट्र राज्याकडून प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. गोंदिया येथील तालुका क्रीडा संकुल, आमगाव येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शहाजी नगर मनपा हिंदी शाळेतील संदीप पासवानने ३६ किलो वजनी गटात, तर विवेक साकेतने ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. दोन्ही विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत दमदार कामगिरी सादर केली.

अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ! पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्वाची बातमी

विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापूर्वी तालुका आणि विभाग स्तरावरही समान वर्चस्व राखत दोन्ही पातळ्यांवर प्रथम क्रमांक पटकावला होता. सातत्यपूर्ण कामगिरी आणि खेळातील निष्ठेमुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.

या उज्ज्वल यशामागे शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण धनुष्यबाण यांचे विशेष सहकार्य असून शारीरिक शिक्षण शिक्षक सुरेश दडस यांनी या दोन मुलांना किक बॉक्सिंगचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक तयारी करून दिली. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या आणि अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर राज्यात सुवर्णपदक मिळवून दाखवले.शहाजी नगर मनपा हिंदी शाळा, चित्ता कॅम्प या विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने शाळेमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी यापूर्वीही विविध क्रीडा उपक्रमांमध्ये चमक दाखवत आहेत. मात्र या दोघांची धमाकेदार कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करते की योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थी-केंद्रित सुविधा मिळाल्यास महानगरपालिकेच्या शाळांमध्येही प्रचंड क्रीडा प्रतिभा दडलेली आहे.

डिजिटल साक्षरता मोहिमेचा राज्यभर विस्तार! ६,००० हून अधिक वंचित तरुणांना लाभ

या दोन्ही युवा क्रीडापटूंच्या निवडीबद्दल पालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी किरत कुडवे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख दत्तू लवटे, प्रशासकीय अधिकारी विद्या मॅडम आणि कनिष्ठ पर्यवेक्षक किरण इंगळे यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या प्रकारे दोन्ही विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात केली आहे, त्यावरून या दोघांकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. किक बॉक्सिंगसारख्या आव्हानात्मक खेळात सुवर्णपदकाची चमक दाखवलेल्या विवेक साकेत आणि संदीप पासवान या दोन्ही मुलांचे हे यश भविष्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Web Title: Shahaji nagar municipal school makes waves across the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • bmc school

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.