फोटो सौजन्य - Social Media
शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन २२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या शैक्षणिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक परीक्षेचे आयोजन केले आहे. आता अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकंदरीत, विद्यार्थ्यांना डिसमेंबरच्या १५ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हीच तारीख हीच शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची नियमित शुल्कासह नोंदणीसाठी अंतिम मुदत असणार आहे.
अर्ज भरायचा तरी कुठे? : शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mscepune.in या किंवा puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मंडळाद्वारे विलंब शुल्काच्या तारखाही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विलंब शुल्कासह मुदत १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर निश्चित करण्यात आले आहे. तर अतिविलंब शुल्कासह तारीख २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर त्याहून उशीर केल्यास उमेदवारांना अतिविशेष विलंब शुल्क भरावे लागेल आणि ती भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असेल.
महत्वाची सूचना अशी आहे की ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे १५ डिसेंबर आधीच ठराविक अर्ज शुल्कासह अर्जाची नोंदणी करणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरेल. ही सर्व माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.






