Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Campus Placement Tips: प्लेसमेंटच्या टेन्शनमुळे त्रस्त आहात का? मग प्लेसमेंटमध्ये यश मिळवण्यासाठी ट्राय करा या ५ टिप्स

Campus Placement Tips: प्रसिद्ध टेक एज्युकेटर आणि मायक्रोसॉफ्टची माजी इंजिनिअर श्रद्धा खापरा यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी ५ प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स नक्की वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 10, 2026 | 02:30 PM
MICROSOFT

MICROSOFT

Follow Us
Follow Us:

Campus Placement Tips: इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट सीजनची चाहूल लागताच एक वेगळीच चलबिचल आणि ताणतणाव पाहायला मिळतो. प्रत्येकजण आपल्या ड्रीम कंपनीत जागा मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतो. अशा वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले, तर यशाचा मार्ग सोपा होतो. विद्यार्थ्यांचा हा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी प्रसिद्ध टेक एज्युकेटर आणि ‘मायक्रोसॉफ्ट वाली दीदी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या श्रद्धा खापरा यांनी ५ अत्यंत उपयुक्त टिप्स शेअर केल्या आहेत.

श्रद्धा खापरा यांचा करिअरचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत शानदार राहिला आहे. दिल्लीतील नामांकित संस्था असलेल्या NSIT मधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट झालेली श्रद्धा DRDO मधील संशोधन प्रकल्पाचा भाग राहिली आहे. तिने दिग्गज टेक कंपनी Microsoft (IDC) मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणूनही काम केले आहे. हजारो विद्यार्थ्यांना DSA, वेब डेव्हलपमेंट, AI/ML आणि DevOps शिकवणाऱ्या श्रद्धा खापरा यांच्या मते, कॅम्पस प्लेसमेंट सीजनमध्ये योग्य रणनीतीने कमी वेळात उत्कृष्ट निकाल मिळवता येऊ शकतो.

कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरीसाठी ट्राय करा या ५ टिप्स

जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असाल आणि कॅम्पस प्लेसमेंटसाठी प्रयत्न करत असाल, तर श्रद्धा खापरांच्या या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

१. दररोजचा सराव ठरतो महत्त्वाचा

कॅम्पस प्लेसमेंट सुरू होण्यापूर्वीचे २ महिने तयारीसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतात. दररोज थोडा-थोडा पण नियमित अभ्यास केल्यास तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूप पुढे जाता. एकाच दिवशी १२ तास अभ्यास करण्यापेक्षा दररोज ३ ते ४ तास पूर्ण लक्ष केंद्रित करून कोडिंग आणि सरावात घालवा.

२. मॉक इंटरव्यू देऊन भीती घालवा

फक्त स्वतः अभ्यास करणे पुरेसे नसते, तर मुलाखतीच्या खोलीतील ताण समजून घेणेही अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मित्रांसोबत किमान २-३ मॉक इंटरव्यू द्या. एक वेळा स्वतः उमेदवार बना आणि दुसऱ्या वेळी मुलाखतकार व्हा. यामुळे स्वतःच्या उणिवा, भाषा आणि कोडिंग लॉजिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळते.

३. ‘ट्यूटोरियल हेल’च्या जाळ्यातून बाहेर पडा

अनेक विद्यार्थी दिवसभर फक्त यूट्यूब किंवा ऑनलाइन कोर्सेसचे व्हिडिओ पाहण्यात घालवतात. याला ‘ट्यूटोरियल हेल’ म्हटले जाते. व्हिडिओ पाहिल्यावर सर्वकाही समजल्यासारखे वाटते, पण जेव्हा स्क्रीनवर स्वतः कोड लिहावा लागतो तेव्हा हात थबकतात. त्यामुळे व्हिडिओ पाहणे कमी करा आणि स्वतः कोडिंगचा सराव करा.

Vande Mataram: राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीतात नेमका काय फरक आहे? जाणून घ्या ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम’चे कायदेशीर नियम!

४. ॲप्टीट्यूड आणि मुख्य विषयांकडे दुर्लक्ष करू नका

अनेक विद्यार्थी आपले संपूर्ण लक्ष फक्त कोडिंग आणि DSA (Data Structures & Algorithms) वर केंद्रित करतात. ते ॲप्टीट्यूड, ऑपरेटिंग सिस्टम (OS), DBMS आणि कॉम्प्युटर नेटवर्क यांसारखे महत्त्वाचे मूळ विषय सोडून देतात. अनेक मोठ्या कंपन्यांच्या पहिल्या राऊंडमध्ये (ऑनलाइन असेसमेंट) ॲप्टीट्यूड हीच पहिली पायरी असते. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये या विषयांची रिव्हिजन नक्की करा.

Fastest Growing Jobs: लिंक्डइनच्या अहवालातून मोठा खुलासा! एआय (AI) च्या युगातही ‘या’ नोकऱ्यांमधून कमवा बक्कळ पैसा

५. तणाव घेऊ नका, हा आयुष्याचा एक छोटा टप्पा आहे

प्लेसमेंटची वेळ जवळ येताच चिंता आणि मानसिक ताण निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु या प्रक्रियेला आपल्या आयुष्याचा अंतिम निर्णय मानू नका. हा एका मोठ्या आणि सुंदर आयुष्याचा खूप छोटासा भाग आहे. तुमचे १०० टक्के द्या, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि निकालाची जास्त चिंता न करता शांत मनाने मुलाखत द्या.

Web Title: Shradha khapra linkedin campus placement tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Interview for Jobs
  • Microsoft

संबंधित बातम्या

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
1

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.