फोटो सौजन्य - Social Media
AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने भरती प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. एअर इंडियामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना एअर इंडियाने जाहीर केले आहे. २ सप्टेंबर २०२४ रोजी या भरती प्रक्रियेविषयीची अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली होती. तेव्व्हापासून अनेक उमेदवारांना या भरती प्रक्रियेची प्रतीक्षा होती. अखेर या प्रतिक्षेस पूर्णविराम मिळाला आहे. सप्टेंबरच्या ४ तारखेला एअर इंडियाने या बझारती प्रक्रियेविषयी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. या अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रियेसंबंधित सखोल माहिती नमूद आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक आहात, तर नक्कीच या अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : UPSC मध्ये भूवैज्ञानिकांच्या ८५ जागांसाठी भरती; २० सप्टेंबरपर्यंत करता येईल अर्ज
या भरती प्रक्रियेमध्ये Handyman च्या पदांचा विचार केला जात आहे. एकंदरीत, Handyman च्या एकूण ६ रिक्त जागांसाठी एअर इंडियाने या भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीची अनेक उमेदवार प्रतीक्षा करत होते अखेर या प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याने उमेदवारांच्या अर्जामध्येही फार गर्दी पाहायला मिळत आहे. रिक्त जागा ६ आणि अर्ज कर्त्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्यामुळे अगदी स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. एअर इंडियाने या भरती प्रक्रियेसंबंधित काही अटी शर्ती जाहीर केल्या आहेत. या अटी शैक्षणिक तसेच वयोमर्यादे विषयक आहे. त्या पाहण्यासाठी कृपया एअर इंडियाने जाहीर केलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
अर्ज करण्याची पद्धत पूर्णता ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या https://www.aiasl.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. एकंदरीत, याच संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, त्याचबरोबर अधिसूचनेचा आढावाही घेता येणार आहे.
हे देखील वाचा : BIS मध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती; पगार ऐकाल तर थक्क व्हाल
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या Walk in Interview मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त झालेल्या उमेदवाराला आसाममध्ये स्थित असलेल्या सिलचार विमानतळावर काम करता येणार आहे. २० सप्टेंबर २०२४ रोजी उमेदवारांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. या संबंधित सखोल माहितीकरिता अधिसूचनेचा आढावा घ्यावा.