फोटो सौजन्य - Social Media
भारतीय मानक ब्युरो (BIS)ने ३०० हुन अधिक पदांसाठी भरतीला सुरुवात केली आहे. भारतीय मानक ब्युरो मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठीही खास भरती प्रकीर्या आयोजित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. भारतीय मानक ब्युरोतील विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत, या पदांमध्ये असिस्टेंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टेंट, असिस्टेंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सीनियर सेक्रेटेरिएट असिस्टेंट तसेच विविध पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरुवात केली आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकर अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सहभागी व्हा. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. सप्टेंबरच्या ९ तारखेपवून या अर्ज प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : UPSC मध्ये भूवैज्ञानिकांच्या ८५ जागांसाठी भरती; २० सप्टेंबरपर्यंत करता येईल अर्ज
भारतीय मानक ब्युरोने या भरती प्रक्रियेसंदर्भांत असलेली अधिसुचहना जाहीर केली आहे. BIS च्या www.bis.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना या भरती विषयी सखोल माहिती मिळवता येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवार CA/MBA/MA/PG/Graduate/10th उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
त्याचबरोबर उमेदवाराला संबंधित कामाचे कौशल्य अवगत असणे अनिवार्य आहे. या शैक्षणिक अटींना पात्र सदस्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसंबंधित अटही नमूद आहे. एकंदरीत, या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यास इच्छुक असणाऱ्या सदस्यांना अर्ज करण्यासाठी किमान वय २७ वर्षे आहे. तर कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.
हे् देखील वाचा : SBI मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदासाठी भरती; सप्टेंबरच्या २४ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना लेव्हल २ ते लेव्हल १० पर्यंत दरमाह वेतन पुरवले जाईल. विविध प्रक्रियांच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची लिखित परीक्षा घेण्यात येईल. त्याचबरोबर उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाईल. तसचे निवड होण्यासाठी उमेदवारांना दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी पात्र करावी लागेल.
महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येईल. असिस्टंट डायरेक्टरच्या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या सदस्यांना ८०० रुपये तर इतर पदांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आकारण्यात येईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.