Photo Credit- Social media
युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिओ वैज्ञानिकांच्या पदाचा विचार केला जात आहे. एकूण ८५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज नोंदवण्यास सुरुवातही केली आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांना सप्टेंबरच्या २० तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुळात, UPSC ने जाहीर केलेल्या या तारखेनंतर केले जाणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे, याचा आढावा घेत.
उमेदवारांनी मुदतीच्याअगोदर ऑनलाईन अर्ज करावेत. या ८५ रिक्त जागांमध्ये जियोलॉजिस्ट ग्रुप-ए च्या १६ जागांचा, जियोफिजिक्स ग्रुप-एच्या ६ जागांचा, केमिस्ट ग्रुप-एच्या 2 जागांचा, साइंटिस्ट-बी (हाइड्रोलॉजी) ग्रुप-एच्या १३ जागांचा, साइंटिस्ट-बी (केमिकल) ग्रुप-एच्या १ जागेचा, साइंटिस्ट-बी (जियोफिजिक्स) ग्रुप-एच्या १ तर असिस्टेंट हायडॉलॉजी ग्रुप-बीच्या ३१ रिक्त जागांचा, असिस्टेंट केमिस्ट्री ग्रुप-बी ४ तसेच असिस्ट जियोफिजिक्स ग्रुप-बीच्या ११ जागांचा समावेश आहे.
अर्ज करण्याअगोदर उमेदवारांना काही अटी शर्तींचा आढावा घ्यावा लागणार आहे, तसेच UPSC द्वारे जाहीर असलेल्या या अटींना पात्र करणे आवश्यक आहे. जिओलॉजिकल सायन्स किंवा जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी, जिओ-एक्सप्लोरेशन किंवा मिनरल एक्सप्लोरेशन किंवा इंजिनिअरिंग जिओलॉजी किंवा मरीन जिओलॉजी किंवा अर्थ सायन्स आणि रिसोर्स मॅनेजमेंट किंवा ओशनोग्राफी आणि कोस्टल एरिया स्टडीज किंवा पेट्रोलियम जिओसायन्स किंवा भूरसायन या विषयात पदव्युत्तर पदवी असलेले जिऑलॉजिस्ट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : BHEL मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा, ‘या’ तारखेला होणार परीक्षा
अधिसुचनेनुसार, अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे इतके असावे. तर उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्षे इतके असावे. महत्वाची बाब म्हणजे आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार काही प्रमाणात सूट दिली जाईल. कंबाइंड जियो-साइंस एग्जामिनेशनच्या द्वारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. मुळात ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाईल. या परीक्षेला पात्र करणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल तसेच त्यांना दस्तऐवजांच्या तपासणीसाठी बोलावले जाईल. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्काची रक्कम सामान्य तसेच OBC प्रवर्गातिल उमेदवारांसाठी २०० रुपये आहे. तर SC /ST /PWD आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.