
फोटो सौजन्य - Social Media
या घटनेविरोधात देशातील अनेक शिक्षक संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. वडाळ्यातील या मोर्चेचे नेतृत्व शिक्षक सेनेचे अध्यक्ष आणि आमदार ज. मो. अभ्यंकर करत आहेत. तसेच त्याच्याकडूनही कॉलेजच्या मॅनेजमेंटवर आरोप करण्यात आलेले दिसून येत आहेत. जर कॉलेजच्या मॅनेजमेंटने पुढील १० दिवसात यावर सकारत्मक निर्णय घेतला नाही तर हा प्रश्न आणि ही मागणी थेट राज्याच्या सभागृहात मांडण्यात येईल अशा इशारा आमदार ज. मो. अभ्यंकरांनी केला आहे.
या सर्व कारणाने कॉलेजचे वातावरणही अतिशय कलुषित झालेले दिसून येत आहे. येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या मनातही भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या मनात असुरक्षितता आहे. याची तक्रार येथील कार्यकारत महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. मोर्चादरम्यान शिक्षक सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली होती. उपप्राचार्या शीला कृष्णन यांच्याशी संबंधित राजीनामा प्रकरणाने वडाळा परिसरात मोठी खळबळ उडवली असून, शिक्षक सेनेच्या मोर्चानंतर कॉलेज व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. आता पुढील दहा दिवसांत होणाऱ्या कमिटी बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षक सेनेने स्पष्ट शब्दांत चेतावणी दिल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.