फोटो सौजन्य - Social Media
सतलुज जल विद्युत निगम लिमिटेड (SJVN Limited) ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधीन काम करणारी नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. SJVN ने जाहिरात क्र. 124/2025 प्रसिद्ध करून विविध शाखांमध्ये वर्कमन ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी एकूण 87 रिक्त पदे उपलब्ध आहेत आणि फक्त हिमाचल प्रदेशाचे रहिवासी उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षणानंतर त्यांना ₹21,500/- प्रारंभिक वेतन (IDA) व भत्ते मिळतील. या भरतीमध्ये असिस्टंट (अकाउंट्स), असिस्टंट, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, स्टोअरकीपर आणि सर्वेअर अशा विविध पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी असिस्टंट (अकाउंट्स) पदासाठी B.Com व टायपिंग 40 wpm आवश्यक आहे; असिस्टंट पदासाठी पदवीधर व 1 वर्षांचा कॉम्प्युटर कोर्स आणि टायपिंग 30/25 wpm अपेक्षित आहे. ड्रायव्हरसाठी 8वी पास व वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स, तर इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, स्टोअरकीपर व सर्वेअर पदांसाठी संबंधित ITI ट्रेड आवश्यक आहे.
अर्जदारांचे वय कमाल 30 वर्षांपर्यंत असावे (13.10.2025 पर्यंत), तर मागासवर्गीय व विशेष पात्र उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सूट दिली जाईल. निवड प्रक्रिया पदानुसार बदलते; इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, स्टोअरकीपर आणि सर्वेअर पदांसाठी फक्त संगणकाधारित परीक्षा (CBT) होईल, तर असिस्टंट (अकाउंट्स), असिस्टंट व ड्रायव्हर पदांसाठी CBT नंतर ट्रेड टेस्ट देखील घेतली जाईल. CBT मध्ये एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, ज्यात 80 प्रश्न संबंधित विषय आणि 20 प्रश्न सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, इंग्रजी यावर आधारित असतील. परीक्षेसाठी भाषा हिंदी व इंग्रजी आहे आणि योग्य उत्तरासाठी 1 मार्क मिळेल, निगेटिव्ह मार्किंग नाही.
अर्ज शुल्क सामान्य, OBC (NCL) व EWS प्रवर्गासाठी ₹200/- असून SC, ST, PwBD आणि माजी सैनिक यांना शुल्क माफ केलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.sjvn.nic.in वर जाऊन “Career” विभागात Workman Trainee Recruitment 2025 लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी, सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, ऑनलाईन शुल्क भरण्याचे काम पूर्ण करून अर्ज सबमिट करावा आणि प्रिंटआउट काढावा. हिमाचल प्रदेशातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.