Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

South Indian Bank Recruitment 2026: महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्णसंधी; जुनियर ऑफिसर पदांसाठी २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सरू

South Indian Bank Recruitment 2026: साऊथ इंडियन बँकेने ‘जुनियर ऑफिसर (ऑपरेशन्स)’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 22, 2026 | 03:50 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • साऊथ इंडियन बँकेत जुनियर ऑफिसर पदांसाठी बंपर भरती
  • महाराष्ट्रातील रिक्त जागांसाठीची ठिकाणे:
  • अर्ज कसा करावा?
South Indian Bank Recruitment 2026: साऊथ इंडियन बँकेने ‘जुनियर ऑफिसर (ऑपरेशन्स)’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी देखील ही सुवर्णसंधी असून औरंगाबाद नागपूर पुणे ठाणे, आणि मुंबई उपनगरात जागा उपलब्ध आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाले असून २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा:

या पदासाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराचा जन्म ०१.१०.१९९८ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा आणि कमाल वय २८ वर्षे असावे. तसेच SC/ST उमेदवारांसाठी वयात ५ वर्षांची सवलत लागू आहे. तसेच त्याने कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारांना बँका किंवा NBFC मध्ये किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

DY Patil Pune: पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ ३ वैज्ञानिकांनी जागतिक पातळीवर मिळवले स्थान

महाराष्ट्रातील रिक्त जागांसाठीची ठिकाणे:

औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगर आणि संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील रहिवासी असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत आणि स्थानिक भाषेचे प्राविण्य असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

पगार आणि इतर लाभ :

निवड झालेल्या उमेदवारांना एकूण वार्षिक सीटीसी (CTC) सुमारे ₹५.१४ लाख मिळेल. याशिवाय बँकेच्या खर्चाने ४० लाख रुपयांपर्यंतचा ग्रुप पर्सनल अपघात विमा आणि ५,२५,००० रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी दिली जाईल. यामध्ये सुरवातीला ३ वर्षांच्या करारावर (Contract) नियुक्ती केली जाईल, जी कामगिरीच्या मूल्यांकनावर बँकेच्या विवेकबुद्धीनुसार नूतनीकरण योग्य राहील.

Anand Kumar News: ‘सुपर ३०’ चा आनंद कुमार जपानमध्ये चर्चेत; पण काय नेमकं कारण? जाणून घ्या

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.southindianbank.bank.in किंवा [https://recruit.southindianbank.com/RDC/](https://recruit.southindianbank.com/RDC/)) जाऊन केवळ ऑनलाइन पद्धतीने २७ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: साऊथ इंडियन बँक भरती २०२६ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२६ ही आहे.

  • Que: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे?

    Ans: उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान ५०% गुणांसह पदवीधर असावा आणि त्याला बँका किंवा NBFC मध्ये किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • Que: महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत?

    Ans: महाराष्ट्रात औरंगाबाद, नागपूर, पुणे, ठाणे आणि मुंबई उपनगर या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत.

Web Title: South indian bank junior officer recruitment 2026 marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs
  • High salary Job

संबंधित बातम्या

सणासुदीच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!
1

सणासुदीच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

Career Growth Mistakes: तुमचेही प्रमोशन अडकले आहे का? करिअरची घसरण रोखण्यासाठी आजच टाळा ‘या’ ५ मोठ्या चुका!
2

Career Growth Mistakes: तुमचेही प्रमोशन अडकले आहे का? करिअरची घसरण रोखण्यासाठी आजच टाळा ‘या’ ५ मोठ्या चुका!

Microsoft Internship 2026: मायक्रोसॉफ्टची धमाकेदार इंटर्नशिप! दरमहा ६ ते १३ लाख रुपयांपर्यंत मिळणार स्टायपेंड
3

Microsoft Internship 2026: मायक्रोसॉफ्टची धमाकेदार इंटर्नशिप! दरमहा ६ ते १३ लाख रुपयांपर्यंत मिळणार स्टायपेंड

Hindusthan Bank Recruitment 2026: ‘हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँके’त बंपर भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
4

Hindusthan Bank Recruitment 2026: ‘हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँके’त बंपर भरती; पदवीधर आणि १० वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.