
Image
१. कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) – ६० पदे
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक तसेच मराठी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा: २२ ते ३५ वर्षे.
परीक्षा अभ्यासक्रम: जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, गणित, मराठी व इंग्रजी व्याकरण, संगणक साक्षरता आणि बँकिंग (परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल).
२. शिपाई (Peon) – ५० पदे
शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: २१ ते ३३ वर्षे.
परीक्षा अभ्यासक्रम: जनरल नॉलेज, मराठी, प्राथमिक इंग्रजी ज्ञान आणि सामान्य गणित (परीक्षेचे माध्यम मुख्यत्वे मराठी असेल).
दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया ९० गुणांची ऑनलाईन परीक्षा, ५ गुणांची तोंडी मुलाखत आणि ५ गुण विशेष गुणवत्तेसाठी असे एकूण १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असून सर्व प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असणार आहेत.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी: १७ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
परीक्षा शुल्क: रु. १०००/- + १८% जीएसटी (GST) + बँक चार्जेस. परीक्षा शुल्क केवळ ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारेच स्वीकारले जाईल.
Sleeping State of India: भारतातील ‘या’ राज्याला का म्हणतात ‘स्लीपिंग स्टेट’? जाणून घ्या
१. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी http://sznsbal.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
२. संकेतस्थळावर नाव नोंदणी करून ऑनलाईन फॉर्म भरावा.
३. अर्जामध्ये पासपोर्ट साईझ फोटो (२० KB पर्यंत) आणि पांढऱ्या कागदावर केलेली स्वाक्षरी (२० KB पर्यंत) स्पष्टपणे अपलोड करणे बंधनकारक आहे.
४. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून अर्ज सबमिट (Submit) करावा आणि अर्जाची व पावतीची प्रत डाऊनलोड करून सुरक्षित ठेवावी.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
Ans: या भरतीद्वारे कनिष्ठ लिपिक (६०) आणि शिपाई (५०) अशा एकूण ११० जागांवर भरती केली जाईल.
Ans: इच्छुक उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
Ans: कनिष्ठ लिपिक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि शिपाई पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.