Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेंकेल इंडियाकडून ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये उभारले स्‍पेस ऑब्‍जर्वेशन सेंटर!

हेंकेल अ‍ॅधेसिव्‍ह्ज टेक्‍नॉलॉजीज इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने ग्‍लोबल मिशन अ‍ॅस्‍ट्रॉनॉमी, इंडियासोबत सहयोगाने  आदर्श इंग्लिश स्‍कूल ठाणे येथे अंतराळ निरीक्षण केंद्राची स्थापना केली आहे. सीएसआरमधून हेंकेलने सुरु केलेली ही 13 वी प्रयोगशाळा आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 30, 2024 | 06:07 PM
हेंकेल इंडियाकडून ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये उभारले स्‍पेस ऑब्‍जर्वेशन सेंटर!

हेंकेल इंडियाकडून ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये उभारले स्‍पेस ऑब्‍जर्वेशन सेंटर!

Follow Us
Close
Follow Us:

ठाण्यातील आदर्श इंग्लिश स्कूल मध्ये  स्पेस ऑब्जर्वेशन सेंटर उभारण्यात आले आहे.  हेंकेल अ‍ॅधेसिव्‍ह्ज टेक्‍नॉलॉजीज इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने ग्‍लोबल मिशन अ‍ॅस्‍ट्रॉनॉमी, इंडियासोबत सहयोगाने  आदर्श इंग्लिश स्‍कूल, ठाणे येथे डॉ. ए. पी. जे. अब्‍दुल कलाम स्‍पेस ऑब्‍जर्वेशन सेंटर या नावाची खगोलशास्‍त्र प्रयोगशाळा व वेधशाळेची स्‍थापना केली आहे.

हेंकेल इंडियाच्‍या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या या खगोलशास्‍त्र प्रयोगशाळा व वेधशाळेचे आर्ममेंट रिसर्च अँड डेव्‍हलपमेंट एस्‍टाब्लिशमेंट (एआरडीई)चे माजी उपसंचालक डॉ. काशीनाथ देवधर, हेंकेल इंडियाचे सीएफओ कृष्‍णा प्रसाद, सरस्‍वती विद्या प्रसारक ट्रस्‍टच्‍या अध्‍यक्ष मीरा कोरडे, आदर्श विकास मंडळचे अध्‍यक्ष सचिन बी. मोरे आणि एव्‍हीएम आदर्श इंग्लिश स्‍कूलच्‍या व्‍यवस्‍थापकीय विश्‍वस्‍त श्रद्धा एस. मोरे यांच्‍या हस्‍ते आज उद्घाटन करण्‍यात आले. या उद्घाटन प्रसंगी हेंकेल इंडियाच्‍या सीएसआर टीमचे सदस्‍य रमित महाजन, भुपेश सिंग, डॉ. प्रसाद खंडागळे, संध्‍या केडलया आणि कुंजल पारेख हे देखील उपस्थित होते.

विक्रम साराभाई यांचा दृष्टीकोन

उपस्थितांना मार्गदर्शन करताना एआरडीईचे माजी उपसंचालक डॉ. काशिनाथ देवधर म्हणाले, ”भारतीय अंतराळ उपक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा असा विश्‍वास होता की भारतातील अंतराळ संशोधन उपक्रम संवाद, हवामानाचा अंदाज आणि शिक्षण यांसारख्या व्यावहारिक उपयोजनांसाठी राबवला गेला पाहिजे. ज्‍यामुळे आपल्या राष्ट्राचा आणि देशवासीयांचा विकास होईल.” ते पुढे म्‍हणाले, ”हेंकेल इंडियाचा खगोलशास्‍त्र प्रयोगशाळा व वेधशाळा सीएसआर उपक्रम डॉ. साराभाई यांच्‍या स्‍वप्‍नाला अधिक पुढे घेऊन जाईल.”याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत हेंकेल इंडियाचे सीएफओ कृष्‍णा प्रसाद म्‍हणाले, “हेंकेल इंडियाचा खगोलशास्‍त्र अंतराळाबाबत रूची निर्माण करेल. ज्‍यामुळे भारतातील भावी शास्‍त्रज्ञ आणि खगोलशास्‍त्रज्ञांसाठी प्रबळ पाया रचला जाईल.”

हेंकेलने स्थापन केली 13 वी प्रयोगशाळा

हेंकेलने पुणे जिल्‍ह्यातील अकरा ठिकाणी आणि नवी मुंबईतील एका ठिकाणी खगोलशास्‍त्र वेधशाळा व प्रयोगशाळा स्‍थापित केल्‍या आहेत. आदर्श इंग्लिश स्‍कूल, ठाणे मधील डॉ. ए. पी. जे. अब्‍दुल कलाम स्‍पेस ऑब्‍जर्वेशन सेंटर अशाप्रकारची तेरावी प्रयोगशाळा आहे. या खगोलशास्‍त्र प्रयोगशाळा व वेधशाळा विद्यार्थ्‍यांना लघुग्रह शोध, ग्रहांचा शोध यामध्‍ये सहभाग घेण्‍याची संधी देतात आणि त्‍यांच्‍यामध्‍ये अंतराळाबाबत कुतूहलता निर्माण करतात, तसेच त्‍यांना अंतराळापलीकडील विश्‍वाबाबत प्रश्‍न विचारण्‍यास प्रेरित करतात. या प्रयोगशाळांमधून दहा हजार विद्यार्थ्‍यांना अंतराळ संशोधन करण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.

सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून समाजाला भविष्‍यासाठी सुसज्‍ज करण्‍याचा प्रयत्‍न

हेंकेल इंडियाचे कंट्री प्रेसिडण्‍ट एस. सुनिल कुमार म्‍हणाले, “आमचा उद्देश ‘पायोनिअर्स अ‍ॅट हार्ट फॉर द गुड ऑफ जनरेशन्‍स’शी बांधील राहत हेंकेल इंडियामध्‍ये आम्‍ही आमच्‍या सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून समाजाला भविष्‍यासाठी सुसज्‍ज करण्‍याचा प्रयत्‍न करतो. समान व सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह आम्‍हाला या सीएसआर हस्‍तक्षेपाच्‍या माध्‍यमातून सरकारी शाळेमधील विद्यार्थ्‍यांना खगोलशास्‍त्र व अंतराळाचे ज्ञान देण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आशा करतो की, यामुळे काही विद्यार्थ्‍यांना भविष्‍यात या क्षेत्रात करिअर घडवण्‍यास स्‍फूर्ती मिळेल.”

‘ट्रेन द ट्रेनर’ ४५० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण

आम्‍ही या सीएसआर उपक्रमांतर्गत ‘ट्रेन द ट्रेनर’ प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील ४५० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. आमच्‍या खगोलशास्‍त्र वेधशाळा व प्रयोगशाळांच्‍या मदतीने विद्यार्थी ग्रहण आणि ग्रह, तारे, लघुग्रह यांचे निरीक्षण अशा विविध क्रियाकलापांमध्‍ये सहभाग घेऊ शकतील. या सीएसआर उपक्रमाच्‍या माध्‍यमातून हेंकेलने १३ सप्‍टेंबर २०२४ रोजी नासाचा (NASA) ‘इंटरनॅशनल ऑब्‍जर्व्‍ह द मून’ उपक्रम राबवला. तसेच, आदल्‍या दिवशी या विद्यार्थ्‍यांना प्रतिष्ठित अंतराळ वैज्ञानिकांकडून ऑनलाइन व्‍याख्‍यान सत्रामध्‍ये मार्गदर्शन देखील मिळाले.

Web Title: Space observation center set up by henkel india at adarsh english school in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 06:07 PM

Topics:  

  • apj abdul kalam
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
4

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.