Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sripati Civil Judge: मुलीच्या जन्मानंतर अवघ्या २ दिवसांत दिली परीक्षा; २३ व्या वर्षी ‘सिव्हिल जज’ बनून श्रीपतीने रचला इतिहास!

Sripati Civil Judge Tamil Nadu: तामिळनाडूच्या मलय्याली आदिवासी समुदायातील २३ वर्षीय श्रीपतीने मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन दिवसांत २०० किमी प्रवास करून सिव्हिल जजची परीक्षा उत्तीर्ण केली. वाचा तिचा थक्क करणारा प्रवास..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 30, 2026 | 03:52 PM
tamil

tamil

Follow Us
Follow Us:

Sripati Civil Judge: कोणत्याही महिलेसाठी आई होणे हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो, परंतु तामिळनाडूच्या श्रीपतीने या काळात घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने तिची देशभरात ओळख निर्माण केली. मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी तिने २०० किलोमीटरचा प्रवास करून सिव्हिल जजची परीक्षा दिली आणि वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ‘सिव्हिल जज’ बनून इतिहास रचला. ती तामिळनाडूच्या ‘मलैयाली आदिवासी’ समुदायातील पहिली महिला सिव्हिल जज ठरली आहे.

दुर्गम गावांतील बालपण आणि गरिबीशी संघर्ष

श्रीपतीचा जन्म तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील धनियाक्कुप्पम या दुर्गम गावात झाला. राखीव वनक्षेत्रात असलेल्या या गावात आजही पक्क्या रस्त्यांचा अभाव असून सर्वात जवळचे बसस्थानक १५ किमी दूर आहे. तिचे वडील मजुरी आणि शेती करायचे, तर आई गृहिणी होती. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही माता-पित्यांनी मुलांच्या शिक्षणाशी तडजोड केली नाही. लहानपणापासूनच आपल्या आदिवासी समाजाला कायदेशीर ज्ञानाअभावी त्रस्त होताना पाहून श्रीपतीने कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले होते.

Chennai Colleges Co-Education: १०० वर्षापूर्वीची परंपरा बदलली! ‘या’ मुलांच्या कॉलेजचे दरवाजे आता मुलींसाठीही उघडले

लग्नानंतरही स्वप्न जिवंत आणि पतीची साथ

शालेय शिक्षणानंतर श्रीपतीने एलएलबी (LLB) पूर्ण केले. तिचे लग्न अगदी कमी वयात झाले आणि तिचे पती ट्रक ड्रायव्हर आहेत. ग्रामीण भागात लग्नानंतर मुलींचे शिक्षण थांबते, परंतु पती आणि सासरच्या खंबीर पाठिंब्यामुळे श्रीपतीने ‘तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या’ (TNPSC) परीक्षेची तयारी सुरूच ठेवली.

आई बनल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत परीक्षा

नोव्हेंबर २०२३ मध्ये श्रीपतीने मुलीला जन्म दिला. बाळंतपणानंतर जेथे महिला विश्रांती घेतात, तेथे परीक्षा जवळ आल्यामुळे श्रीपतीने नवजात बाळाला कुटुंबाकडे सोडले आणि पतीसोबत २०० किमीचा प्रवास करून परीक्षा केंद्र गाठले. तिची मेहनत फळाला आली आणि ती न्यायाधीश बनली. तिच्या या यशाबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही तिचे कौतुक केले. गरिबी, दुर्गम भाग आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर मात करत मिळवलेले तिचे हे यश आज लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

Droupadi Murmu: राष्ट्रपतींच्या हस्ते लष्करी अधिकाऱ्यांचा गौरव! जाणून घ्या ‘या’ लष्करी पदकांबद्दल सविस्तर..

Web Title: Sripati civil judge tamil nadu tnpsc exam success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Girl
  • inspiration
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

Crime News: मोबाईलमधील डिलीट डेटा ठरला महत्त्वाचा; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा
1

Crime News: मोबाईलमधील डिलीट डेटा ठरला महत्त्वाचा; तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.