सौजन्य-Staff selection Commision
एसएससी सीजीएल निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. लवकरच स्टाफ सिलेक्शन कमीशन कडून कंबाइड ग्रॅज्युएट लेवल टियर- 1 निकाल घोषित केला जाणार आहे. ज्या परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली आहे. ते ऑनलाईन माध्यमाद्वारे एसएससीचे अधिकृत संकेतस्थळ ssc.gov.in वर हा निकाल पाहू शकतात.
CGL टियर 1 ही परीक्षा गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 9 ते 26 या दरम्यान देशभरातील असंख्य परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेची उत्तरपत्रिका ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना ८ ऑक्टोबरपर्यंत त्यावर हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर आता अंतिम उत्तर प्रतिकेच्या आधारे येत्या काही दिवसातच निकाल एसएससीद्वारे जाहीर केले जातील. यासंबंधी सविस्तर माहिती घेऊयात
एसएससी सीजीएल टियर 1 परीक्षेचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंबंधी सध्या कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही. तशी सूचना आल्यास तुम्हाला त्वरीत कळविण्यात येईल. हे लक्षात ठेवा की, जे उमेदवार टियर 1 च्या परीक्षेत यशस्वी होतील तेच उमेदवार टियर 2 परीक्षेत बसू शकतात. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती गुण मिळवावे लागतील हे माहिती असणे आवश्यक आहे.
सीजीएल टियर 1 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण
SSC CGL टियर 1 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवाराला किमान 30 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर, OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना किमान 25 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय इतर प्रवर्गातील उमेदवारांना किमान 20 टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे. हे या परीक्षेतील किमान पात्रता गुण आहेत. याशिवाय टियर 2 च्या परीक्षेला पात्र होण्यासाठी उमेदवाराला कट ऑफ पार करणे देखील आवश्यक आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा