फोटो सौजन्य- सोशल मीडिया
कर्मचारी निवड आयोगाने एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये सहभागी झालेले उमेदवार एसएससीची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन आपले निकाल पाहू शकतात. आयोगाने या निकालासह कटऑफ आणि गुणवत्ता यादीही प्रसिद्ध केली आहे. आयोगाने पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र CAPF (Central Armed Police Forces) आणि SSF (Secretariat Security Force) कटऑफ आणि गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
आयोगाने जारी केलेल्या नोटीसनुसार SSF, CAPF आणि आसाम रायफल्समध्ये 39375 पुरुष आणि 4891 महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 845 उमेदवारांचा निकाल रोखण्यात आला आहे. आयोगाने या निकालामध्ये कोणतीही राखीव किंवा प्रतीक्षा यादी तयार केलेली नाही.
SSC GD मध्ये निवड प्रक्रिया 5 टप्प्यात केली गेली. ते टप्पे पुढीलप्रमाणे
संगणक आधारित परीक्षा (CBE)
शारीरिक मानक चाचणी (PST)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
वैद्यकीय तपासणी
दस्तऐवज पडताळणी
कटऑफ तपासा
SSC GD कट ऑफ 2024: किती महिलांची निवड झाली
SSC कॉन्स्टेबल GD भरती 2024 मध्ये महिलांची संख्या 5150 होती, यापैकी 473 माजी सैनिकांसाठी (ESM) राखीव होत्या. सर्वसाधारण श्रेण्यांमध्ये, 2231 रिक्त पदे अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी रिक्त होते, त्यानंतर OBC करिता 1,087, SC साठी 794, EWS साठी 592 आणि ST साठी 476 जागा रिक्त होत्या. अंतिम SSC GD गुणवत्ता यादीप्रमाणे 4891 महिला उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये सर्व श्रेणीतील महिलांचा समावेश आहे. केवळ ESM यामध्ये दर्शविण्यात आली नाही आहे.
SSC GD कट ऑफ 2024: पुरुष उमेदवारांची निवड
कॉन्स्टेबल जीडी भरतीमध्ये एकूण 41,467 रिक्त जागांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये माजी सैनिक (ESM) साठी 4,164 रिक्त जागा राखीव होत्या. सर्वसाधारण श्रेणींमध्ये, अनारक्षित उमेदवारांसाठी 17,365 जागा उपलब्ध होत्या, त्यानंतर OBC साठी 8,712, SC साठी 6,032, EWS साठी 5,040 आणि ST साठी 4,318 जागा उपलब्ध होत्या. एकूण रिक्त पदांपैकी 39,375 उमेदवारांची निवड करण्यात आली.
पदांनुसार रिक्त जागांची संख्या
या भरतीप्रक्रियेमध्ये एकूण जागा या 46617 होती. यापैकी 12076 जागा बीएसएफसाठी, 13632 जागा सीआयएसएफसाठी, 9410 जागा सीआरपीएफसाठी, 1926 जागा एसएसबीसाठी, 6287 जागा आयटीबीपीसाठी, 2990 जागा एआर, 296 जागा एसएसएफसाठी आहेत.
लेखी परीक्षा आणि निकाल
या भरतीची लेखी परीक्षा ही 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 आणि पुन्हा 30 मार्च 2024 रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेचा निकाल हा 11 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आला होता.