सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. NLC ( Neyveli Lignite Corporation Limited) ने विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. याकरिता उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठीची अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपर्यंत भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन (NLC) ही कंपनी भारतातील नवरत्न कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (GET) च्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये विविध तांत्रिक क्षेत्रातील एकूण 167 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
NLC भरती 2024: पदे आणि जागा
मेकॅनिकल : 84 जागा
इलेक्ट्रिकल: 48 जागा
सिव्हिल: 25 जागा
नियंत्रण आणि उपकरणे: 10 जागा
शैक्षणिक पात्रता
वरील नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर, OBC प्रवर्गाला 3 वर्षांची व SC/ST प्रवर्गाला 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाते. ही वयाची गणना 1 डिसेंबर 2024 पासून केली जाईल.
अर्ज शुल्क
अनारक्षित/ओबीसी (NCL)/EWS साठी: 854 रुपये
SC/ST/PWD/माजी सैनिकांसाठी: 354 रुपये
निवड प्रक्रिया
एनएलसी इंडिया लिमिटेड गेट भरतीकरिता उमेदवारांना त्यांच्या गेट-२०२४ मार्कांच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. निवड प्रक्रियेत गेट स्कोअरला ८० गुण तर वैयक्तिक मुलाखतीला २० गुण दिले जातात. मुलाखतीकरिता निवडलेल्या उमेदवारांना १:६ गुणोत्तर राखले जाईल. गेट परीक्षा आणि मुलाखत दोन्हीचे एकत्रित गुण हे उमेदवारांचे अंतिम निवड निश्चित करतील.
अर्ज सुरू होण्याची तारीख
16 डिसेंबर 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरु होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या तारखेपासून अर्ज करु शकतो.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
15 जानेवारी 2025 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करु शकतो. या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्यास 1 महिन्याचा अवदी देण्यात आला आहे. मात्र उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसहित लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NLC च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in ला भेट द्यावी
त्यानंतर वेबसाइटवरील ‘करिअर’ विभागात जा आणि “ग्रॅज्युएट एक्झिक्युटिव्ह ट्रेनींची भर्ती (GETs)” या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
अखेर, विहित अर्ज शुल्क भरावी
सर्व फॉर्म पूर्णपणे वाचावा आणि त्यांनतर तो फॉर्म सबमिट करावा
त्या फॉर्मची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
अधिसूचनेकरिता इथे क्लिक करा.