फोटो सौजन्य - Social Media
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सब-इन्स्पेक्टर (SI) भरती परीक्षा 2025 ची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमध्ये (CAPF) पदे भरली जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर रात्री 11 वाजेपर्यंत आहे. उमेदवारांना अर्जात सुधारणा करण्याची संधी 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान मिळेल. संगणकाधारित परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात येणार आहे.
या भरतीत एकूण 3073 पदे उपलब्ध असून, त्यापैकी दिल्ली पोलिस दलात 212 आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांत 2861 पदांचा समावेश आहे. दिल्ली पोलिस (पुरुष) गटात 142 पदे असून त्यात 63 अनारक्षित, 35 ओबीसी, 19 एससी, 10 एसटी आणि 15 ईडब्ल्यूएस पदांचा समावेश आहे. दिल्ली पोलिस (महिला) गटात 70 पदे असून त्यात 32 अनारक्षित, 17 ओबीसी, 9 एससी, 5 एसटी आणि 7 ईडब्ल्यूएस पदे आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 2861 पदांचा समावेश असून, विविध दलांमध्ये पदे वाटप करण्यात आली आहेत. यामध्ये सीआरपीएफमध्ये 1029, बीएसएफमध्ये 223, आयटीबीपीमध्ये 233, सीआयएसएफमध्ये 1294 आणि एसएसबीमध्ये 82 पदे उपलब्ध आहेत.
या भरती प्रक्रियेत दिल्ली पोलिसातील विभागीय उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेले कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल तसेच एएसआय (ASI) पदावरील कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा
वयोमर्यादेत शिथिलता सरकारी नियमांनुसार लागू होणार आहे.
शैक्षणिक पात्रता व शारीरिक क्षमता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे निश्चित शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, शारीरिक क्षमता चाचणीत पात्र होणे बंधनकारक आहे. धावणे, उंच उडी, लांब उडी यांसारख्या कसोट्यांमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांनाच निवड प्रक्रियेत संधी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी नियोजित तारखांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची लिंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. ही भरती सीएपीएफ आणि दिल्ली पोलिसात स्थिर, प्रतिष्ठित आणि सुरक्षित करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे. योग्य शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि शारीरिक क्षमता पूर्ण करणाऱ्या इच्छुकांनी अर्ज नक्की करावा. अधिक माहिती व सविस्तर जाहिरातीसाठी उमेदवारांनी लवकरच जाहीर होणाऱ्या अधिकृत अधिसूचनेकडे लक्ष ठेवावे.