फोटो सौजन्य - Social Media
राज्यात काही ठिकाणी अनेक दिवसांपासून कोसळधार बरसत आहे. या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांवर मोठा परिणाम झाला आहे. इतका की एका गावाहून दुसऱ्या गावी जाणे अशक्य झाले आहे. गावांचा संपर्क तुटल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षेच्या तारीख ढकलण्यात आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर परिस्थितीत येणाऱ्या अडचणींचा त्रास होता कामा नये आणि त्याचा परिणाम त्यांच्या तयारीवर होता कामा नये.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षा सप्टेंबर २८ तारखेला जाहीर केली होती. पण बदलत्या तारखेमुळे आता परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना फायदा म्हणजे अभ्यासाला आणखीन वेळ मिळेल आणि पुरस्थितीमध्ये होणारे नुकसान टाळता येतील. पण नफा म्हणजे जी गोष्ट लवकर होणार होती ती जरा उशीरावर जाईल.
मध्य महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या या अति कोसळधारेमुळे तेथील जनजीवन योग्य दिशेने कार्य करत नाही. पुराच्या पाण्यामुळे रस्तेवाहतूक बंद आहे. काही ठिकाणी सुरु असली तरी पुराचे मोठे परिणाम त्यावर दिसून येत आहे. अशामध्ये येत्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर पोहचता न येणे तसेच पोहचण्यास विलंब होणे या गोष्टी टाळण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा शासनाच्या विनंतीनुसार आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी ढकलले आहे.
परीक्षा केंद्र तथा उपकेंद्रामध्ये काहीच बदल करण्यात आला नाही. ९ नोव्हेंबर रोजीही त्याच केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल. पण या बदलत्या तारखेचा परिणाम सारख्या दिवशी ( ९ नोव्हेंबर ) रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ च्या तारखेवर होणार आहे. याबाबत सुधारित दिनांक आयोग लवकरच जाहीर करणार आहे.
राज्यातील पूरस्थिती पाहता अनेक राजकीय पक्षांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षांनी एमपीएससीकडे लेखी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य शासनाच्या वतीने आयोगाला पत्र लिहून परीक्षेची तारीख बदलण्याची विनंती केली होती. अखेर आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतला आहे. तर आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबरऐवजी 9 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.