Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ उत्साहात! देशभक्तीपर उपक्रम पडले पार

‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि डॉ. आंबेडकर शाळाप्रवेश दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ उत्साहात साजरा झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 09, 2025 | 07:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ मोठ्या उत्साहातसाजरा
  • ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन
  • ‘वंदे मातरम्’ या विषयावर निबंध स्पर्धा

‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Nashik ) शाळाप्रवेश दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्ती, ऐक्य आणि समाजभानाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शिक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर! ५ गटांमध्ये होणार आयोजन

पळसे येथील नासाका विद्यालयात या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. तालासुरात सादर झालेल्या या गीतानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच ‘वंदे मातरम्’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सृष्टी आडके, प्रियंका काजळे, श्रीरंग मुंजे, साक्षी मोरे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून पारितोषिके मिळवली.

दरम्यान, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित टिब्रेवाला इंग्लिश मीडियम शाळेतही ‘वंदे मातरम्’ गीताचे गायन करून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभाग शालेय समितीचे अध्यक्ष अॅड. संजय खरोटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना दृढ होते,” असे मत व्यक्त केले. इगतपुरीतील नायडी डोंगरावर कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी विशेष उपक्रम राबवला. भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहकांनी डोंगरावर तिरंगा फडकावून ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला. या वेळी देशभक्तीच्या घोषणा देत वातावरण भारावून गेले.

AIIMS मध्ये नोकरीची संधी! लेखी परीक्षा होणार नाही, मुलाखतीच्या आधारे होणार निवड 

तसेच चांदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’ या गीतातील अर्थ आपल्या जीवनात उतरवण्याचे आवाहन केले. “देशाच्या एकतेसाठी हे गीत केवळ राष्ट्रभक्तीचे प्रतीक नाही, तर प्रेरणेचा स्रोत आहे,” असे त्यांनी सांगितले. जिल्हाभर झालेल्या या कार्यक्रमांमुळे ‘वंदे मातरम्’चा जयघोष घुमला. देशभक्तीचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना जागवली गेली.

Web Title: Students day in schools in nashik district with enthusiasm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

इमारत जुनी झाल्याने पाडणे आवश्यक! भालेकर शाळेच्या जागी नवी शाळाच उभारणार- दादा भुसे
1

इमारत जुनी झाल्याने पाडणे आवश्यक! भालेकर शाळेच्या जागी नवी शाळाच उभारणार- दादा भुसे

Nashik Crime: सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच पेटवली चिता
2

Nashik Crime: सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच पेटवली चिता

Nashik: ‘कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत’, मंत्री नितेश राणे यांचा इशारा; तर विरोधकांवर टीकास्त्र
3

Nashik: ‘कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत’, मंत्री नितेश राणे यांचा इशारा; तर विरोधकांवर टीकास्त्र

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!
4

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.