Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान”

रावसाहेब पटवर्धन विद्यालयात “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 16, 2025 | 03:03 PM
रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला "प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान"

रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला "प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान"

Follow Us
Close
Follow Us:
  • रावसाहेब पटवर्धन विद्यालयात प्रदूषण मुक्त दिवाळी
  • शिक्षक व विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली
  • दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी निर्णय

दिवाळी ही तेजस्वी दिव्यांनी सजलेली, फुलांच्या माळांनी सजलेली आणि भरपूर स्वादिष्ट गोड पदार्थांनी असते. हा सण दरवर्षी संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील सर्वात खास आणि महत्त्वाच्या सणांपैकी दिवाळी हा पहिला मानला जातो, कारण हा सण प्रत्येकासाठी खूप आनंद आणि नवीन उत्साह घेऊन येतो. दिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र – मैत्रिणीं, नातेवाईकांना भेटून शेभुच्छा देतात.सध्याच्या काळात दिवाळीचा सण आपल्यासोबत खूप प्रदूषण घेऊन येतो. जसे की दिवाळीच्या काळात फटाके, रसायने आणि प्लास्टिकचा वापर वाढतो सर्वांना माहीत आहे. ज्यामुळे दीर्घकाळ प्रदूषण होते, पण या प्रदूषणापासून आपण आपले पर्यावरण (Environment) वाचवू शकतो. याचदरम्यान रावसाहेब पटवर्धन विद्यालयात प्रदूषण मुक्त दिवाळी अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.

 दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी हे अभियान राबवण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व आरोग्यास होणारे दुष्परिणाम याबाबत पुष्पक कांदळकर सर व शाळेचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. रावसाहेब पटवर्धन विद्यालयात “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि फटाकेमुक्त, स्वच्छ व सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणे हा होता.

या अभियानाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी फटाके न फोडण्याची आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणावर तसेच माणसाच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक पुष्पक कांदळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रदूषणाचा वाढता धोका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या छोट्या कृतीतूनही पर्यावरण संवर्धनात मोठा वाटा उचलता येतो, हे समजावून सांगितले. शाळेचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी फटाके न फोडता आनंदी आणि सुरक्षित दिवाळी कशी साजरी करता येते, याचे महत्त्व पटवून दिले.

शाळेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवे, कागदी सजावट आणि सेंद्रिय रंग वापरून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “हरित दिवाळी, सुरक्षित दिवाळी” या घोषणांद्वारे संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून शालेय स्तरावरच पर्यावरण रक्षणाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी दृढतेने व्यक्त केला.

धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकट होईल दूर

Web Title: Students of raosaheb patwardhan school pledged for a pollution free diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Diwali
  • Pune

संबंधित बातम्या

Diwali 2025: दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण
1

Diwali 2025: दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जाते? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकट होईल दूर
2

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचे करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकट होईल दूर

अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी
3

अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत- तिखट मुगडाळ, नोट करा रेसिपी

Diwali 2025 : खमंग, कुरकुरीत आणि आकर्षित दिसणारी ‘चंपाकळी’; दिवाळीच्या फराळात नक्की करा समावेश
4

Diwali 2025 : खमंग, कुरकुरीत आणि आकर्षित दिसणारी ‘चंपाकळी’; दिवाळीच्या फराळात नक्की करा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.