
फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण यश केवळ काहींच्याच वाट्याला येतं. अशाच यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे गोविंद जायसवाल, ज्यांनी फक्त २२ वर्षांच्या वयात पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करून देशात ४८वी रँक मिळवली.
गोविंद यांचे वडील नारायण जायसवाल हे वाराणसीत रिक्षा चालवत होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. आईच्या निधनानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली, पण वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. त्यांनी स्वतःचे सर्व रिक्शे विकले आणि शेवटी स्वतः रिक्षा चालवून गोविंदच्या शिक्षणाचा खर्च भागवला.
गोविंदला आयुष्याची खरी दिशा मिळाली ती एका चित्रपटातून ‘अब दिल्ली दूर नहीं’ पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की ते IAS अधिकारी बनणारच. त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि 2006 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देशभरात आपलं नाव कमावलं.
आज गोविंद जायसवाल यांनी नागालंडमध्ये असिस्टंट कमिश्नर, गोव्यात स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, तसेच आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. गरीबी, अडचणी आणि संघर्ष असूनही जिद्द कायम ठेवली, तर यश मिळणं अशक्य नाही. गोविंद जायसवाल यांची कहाणी ही जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर आयुष्य बदलण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे.
अशा प्रकारे करा UPSC ची तयारी
UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते, पण योग्य नियोजन आणि सातत्य असेल तर यश नक्की मिळतं. सर्वप्रथम परीक्षा पद्धती, विषय आणि अभ्यासक्रम नीट समजून घ्या. किमान ६-८ तास नियमित अभ्यास करा. बेसिक मजबूत झाल्यावर रेफरन्स बुक्स वाचा. दररोज वृत्तपत्र वाचा आणि नोट्स तयार ठेवा. वेळेचे नियोजन आणि उत्तर सादरीकरण सुधारते. यश एकाच दिवसात मिळत नाही, म्हणून हार मानू नका. सातत्य, संयम आणि आत्मविश्वास हेच UPSC यशाचं खरं सूत्र आहे.