
फोटो सौजन्य - Social Media
त्यांना हा मनाचा पुरस्कार देण्यामागचे सगळ्यात मोठे कारण पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि कमी प्रदूषण देणारी कूलिंग टेक्नॉलॉजी प्रोत्साहन या कार्यामुळे त्यांना हा मनाचा पुरस्कार देण्यात आला. त्यांचा अनुभव फार मोठा आहे. १९९१ बॅचचे त्या IAS असून ३० पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांनी प्रशासन, आरोग्य आणि पर्यावरण विषयात उल्लेखनीय योगदान केले आहे. नीलगिरी जिल्ह्याच्या कलेक्टरपदावर ‘ऑपरेशन ब्लू माउंटन’ राबवले तसेच सिंगल-यूज प्लास्टिक बंदीचे महत्त्वाचे अभियानदेखील त्यांनी राबवले. त्यांच्या कडून असे अनेक अभियान राबवण्यात आले आहे.
सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे एका दिवसात सर्वाधिक झाडे लावल्याचा Guinness World Record त्यांच्या नावे नमूद आहे. त्यांनी त्यांच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांना प्लास्टिक पिशवी सोडून खास कापड्याच्या पिशव्या वापरण्याचे आव्हान केले. त्यासाठी त्यांनी ‘Meendum Manjappai’सारखे अभियान राबवले. म्हणजेच ‘पुन्हा पिवळी थैली’! या मोहिमेच्या माध्यमातून इतकी जनजागृती प्रसिद्ध झाली की या मोहिमेची लोकप्रियता देशाच्या सीमेबाहेरही पोहचली.
त्या सध्या सध्या तमिळनाडू सरकारच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागात अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या दूरदर्शन महानिदेशक (Director General) पदी काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने १० कोटी झाडे लावणे, ६५ नवे राखीव वन निर्माण करणे आणि मॅंग्रोव्ह क्षेत्र दुप्पट करणे यांसारखे प्रकल्प सुरू करण्यात आले. त्या ‘कौन बनेगा करोड़पति’ शोचाही भाग राहिल्या आहेत.