फोटो सौजन्य - Social Media
पवईतील एका शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात या डिजिटल लर्निंग सेंटरची सुरुवात करण्यात आली. या केंद्रांमध्ये इयत्ता १ ते १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान, डिजिटल साधनांचा वापर, कोडिंग, सर्जनशील डिझाइन, डिजिटल नीतिमत्ता आणि आधुनिक तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देण्यासाठी अत्याधुनिक संगणक, सॉफ्टवेअर आणि शिक्षण सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रशिक्षणाची रचना युनेस्कोच्या डिजिटल साक्षरता अभियानाशी सुसंगत ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या डिजिटल कौशल्यविकासासाठी जागतिक मानकांचे पालन केले जात आहे. विशेषतः सरकारी आणि अल्प-उत्पन्न गटातील शाळांवर लक्ष केंद्रीत करून डिजिटल दरी कमी करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे. डिजिटल लर्निंग सेंटरमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदार वापर शिकण्याबरोबरच भविष्यातील रोजगार संधींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात कोडिंग, ग्राफिक डिझाइन किंवा संगणकीय विचारसरणी या कौशल्यांची गरज वाढत असताना, अशा प्रकारच्या प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी एक भक्कम पाया देतात.
एएसयूएस इंडियाने तंत्रज्ञानाद्वारे समाजाला सक्षम करण्याचे ध्येय ठेवून अनेक वर्षांपासून डिजिटल शिक्षणाच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. विद्या फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेला हा नवा टप्पा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर स्थानिक तरुणांसाठीही नोकरीपूर्व प्रशिक्षण, डिजिटल कौशल्यविकास आणि करिअर तयारीची मोठी संधी निर्माण करणार आहे. एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा हा संयुक्त प्रयत्न समाजात डिजिटल समानता, दर्जेदार शिक्षण आणि समुदाय सक्षमीकरण घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवण्याचा हेतू या उपक्रमामागे असून, आगामी काळात अशा केंद्रांची संख्या वाढवण्याचेही संकेत संस्थांनी दिले आहेत.






