Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीडीएस पासून IPS अधिकारी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! सलग अनेक वर्षे…

IPS वरुण कुमार यांची कहाणी दाखवते की चिकाटी, पालकांचा आधार आणि ठाम ध्येय असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 30, 2025 | 08:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

तमिळनाडूमधील रहिवासी वरुण कुमार यांनी लहानपणापासूनच अभ्यासात चांगली प्रगती केली. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण कॅम्पियन हायर सेकंडरी स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून आई गृहिणी आहेत, तर त्यांचा भाऊ सध्या अमेरिकेत कार्यरत आहे. शैक्षणिक प्रवासात त्यांनी चेन्नईतील रागास डेंटल कॉलेज मधून BDS (Bachelor of Dental Surgery) ही पदवी संपादन केली. दंतवैद्यकाची पदवी मिळवूनही त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसकडे आकर्षण वाटले. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वर्ष 2003 मध्ये पाहिलेला काखा काखा हा तमिळ चित्रपट. या चित्रपटाने त्यांच्या मनात एक ठाम विचार निर्माण केला की देशासाठी काम करायचे असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस हाच योग्य मार्ग आहे. देशसेवेची जिद्द आधीपासून होतीच, मात्र या चित्रपटाने त्यांच्या करिअरची दिशा बदलून टाकली.

ऑफिसमध्ये दिसा प्रोफेशनल! हे घ्या टिप्स, वापरात आणाल तर कॉन्फिडन्ट बनाल

वरुण कुमार यांनी 2007 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. सलग अनेक वर्षे त्यांना अपयशाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी हार मानली नाही. जवळपास चार वर्षांच्या संघर्षानंतर अखेर त्यांना यश मिळाले. या प्रवासात त्यांच्या पालकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला. अपयशाच्या क्षणी पालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना धीर दिला आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार आई-वडिलांनी कधीही त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावले नाही, उलट प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली.

“आय म्या पंतप्रधान पाह्यला” : सुभाष सोनकांबळे यांचे पुस्तक लंडनसह जगभरात प्रकाशित  

आज IPS वरुण कुमार त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, कठोर निर्णयक्षमता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. लहान वयातच त्यांनी एक मोठी उपलब्धी मिळवली असून ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांची कहाणी हे दाखवते की ठाम ध्येय, सातत्यपूर्ण परिश्रम आणि कुटुंबाचा आधार असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते. बारावीपासून बीडीएसपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर UPSC मधील यश, हे सर्व मिळवताना त्यांनी चिकाटी, संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवला. त्यांचे जीवन हे दाखवते की प्रेरणा कुठूनही मिळू शकते. कधी एखाद्या चित्रपटातून, तर कधी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे. शेवटी मात्र सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न हेच स्वप्न पूर्ण करण्याचे गमक आहे.

Web Title: Success story of iips offiver varun kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

आधी UPSC मग लग्न! पतीसह पत्नीही सिव्हिल अधिकारी; यश मिळण्याआधी केले डेट मग जोडले आयुष्यभरचे नाते
1

आधी UPSC मग लग्न! पतीसह पत्नीही सिव्हिल अधिकारी; यश मिळण्याआधी केले डेट मग जोडले आयुष्यभरचे नाते

Delhi CM : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांना हटवले, आता कोणाची नियुक्ती? वाचा सविस्तर
2

Delhi CM : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांना हटवले, आता कोणाची नियुक्ती? वाचा सविस्तर

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC
3

IAS सोडून IFS झाला पठ्ठया! कोण आहे ऋषभ चौधरी? अभियांत्रिकी क्षेत्र सोडून पात्र केले UPSC

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा
4

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.