Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Educational Success Story : ‘हेमकृष्ण पिसदे’ जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण… गोंदियाचा पठ्ठ्या झाला साहेब!

गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारा हेमकृष्ण पिसदे सध्या चर्चेत आला आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत त्याने AIR 839 रँक मिळवून यश संपादन केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चर्चेत असणारे नाव म्हणजे हेमकृष्ण पिसदे!
  • संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा निकाल लागला.
  • अतिशय परिश्रमाने यंदाच्या निकालात AIR 839 रँक मिळवली
हेमकृष्ण पिसदे, गोंदिया जिल्ह्यातील एका दुर्गम भागात राहणारा हा मराठी पठ्ठ्या आज सगळ्यांच्या चर्चेत आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा निकाल लागला. त्या निकालात देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे, त्यातील एक चर्चेत असणारे नाव म्हणजे हेमकृष्ण पिसदे! आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्मलेल्या या वाघाने दाखवून दिलं आहे की जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर तुमची परिस्थिती काहीही असू द्या, तुमच्या आणि यशाच्या दरम्यान कधीच कुणी येत नाही. हे सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोंदियाचा हेमकृष्ण पिसदे!

प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा

आदिवासी भागात राहणारा हा तरुण एका दुर्गम भागातून अतिशय गरीब कुटुंबातून येतो. या भागात ना कसल्या सुविधा, ना काही! देशात या भागाला नक्षल भाग म्हणून ओळखला जातो. त्यात घरची परिस्थितीही बेताची होती म्हणून वडिलांनी हेमकृष्णला नोकरीला जाण्याचा आदेश दिला. आई-वडील तसे साधे शेतकरी पण हेमकृष्णांचे स्वप्न काही तरी मोठे करण्याचे होते पण त्याने बाबांचे शब्द पाळले आणि मुंबईत कामगार अधिकारी म्हणून नोकरी केली. त्यांनतर त्याने तहसीलदारपदी नियुक्ती मिळवली. पण देशासाठी काही तरी करण्याचे स्वप्न त्याला शांत बसू देत नव्हते. त्याने UPSC ची तयारी सुरु केली.

अमरावतीमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्याने UPSC च्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली आणि अतिशय परिश्रमाने यंदाच्या निकालात AIR 839 रँक मिळवली. त्याने त्याच्या यशावर एक भाष्यही केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, “दुर्गम भागात राहत असूनही मोठ्या जिद्दीने अभ्यास केला तर यश नक्की मिळते, हा विश्वास आज सार्थ ठरला. माझ्या यशाचे खरे श्रेय माझ्या पालकांना आणि शिक्षकांना जाते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले, तर निश्चितच यश मिळते.”

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी 

गरीब शेतकरी घरात आणि आदिवासी भागात जन्मलेला हा पठ्ठ्या, पुढे पुण्यात उच्च शिक्षण घेतो. चारवेळा MPSC च्या परीक्षा उत्तीर्ण करतो आणि शेवटी नायब तहसीलदार असून देशसेवेची वेडापायी AIR 839 रँकने UPSC सारखी कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करतो, खरंच हेमकृष्ण पिसदे, तरुणाईसाठी एक आदर्श ठरतोय.

Web Title: Educational success story of hemkrishna pisade from gondia upsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • ias
  • IAS exam
  • IPS

संबंधित बातम्या

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार? जाणून घ्या.
1

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार? जाणून घ्या.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.