फोटो सौजन्य - Social Media
आंध्र प्रदेशमधील एका साध्या गावात जन्मलेले उदय कृष्ण रेड्डी यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी आहे. बालपणातच त्यांना दु:खांचा सामना करावा लागला. फक्त पाच वर्षांचे असताना त्यांनी आपली आई गमावली, आणि काही वेळाने वडिलांचाही आधार हरवला. त्या काळी त्यांच्या ताईने त्यांचा सांभाळ केला. तिने घर चालवण्यासाठी आणि भावाच्या शिक्षणासाठी भाज्या विकल्या. ती उदय यांना नेहमी म्हणायची की, “फक्त दहावीपर्यंत शिकलास तरी खुप आहे.” पण उदयला इथे थांबायचे नव्हते. पण त्यांचे शिक्षणप्रेम पाहून, त्यांच्या ताईनेही परिस्थितीच्या आड जाऊन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही.
उदय सुरुवातीला डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होते. त्यांनी मेडिकल लॅब टेक्निशियनचे शिक्षण घेतले, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरू केली आणि पोलिस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्यावर २०१३ ते २०१८ पर्यंत आंध्र प्रदेश पोलिस दलात काम केले.
पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी असली तरी समाजात अपेक्षित सन्मान मिळत नव्हता. २०१८ मध्ये सीनियर ऑफिसरच्या अपमानामुळे उदय खूप खचले. त्यांच्या सर्कल इन्स्पेक्टरने जवळपास ६० साथी पोलिसांसमोर त्यांचा अपमान केला. या घटनेने त्यांना झकझोरून टाकले आणि त्यांनी ठरवले की, यूपीएससीची तयारी करायची. ते पूर्णपणे नव्याने, तेलुगु माध्यमातून शिकलेल्या असताना इंग्रजीतून अभ्यास सुरू करताना NCERT पुस्तके, उपन्यास आणि ऑक्सफोर्डच्या ३,००० कीवर्ड्सचा आधार घेतला. त्यांनी दिवस-रात्र मेहनत केली, आणि दोन वेळा UPSC परीक्षा क्रॅक केली.
सर्वप्रथम २०२३ मध्ये त्यांनी UPSC CSE परीक्षा क्रॅक केली आणि ७८०वी रँक मिळाली. पण उदय यांच्यासाठी हे समाधानकारक नव्हते. त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि २०२४ मध्ये परीक्षा देऊन ३५०वी रँक मिळवली. या रँकवर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये त्यांना IPS कॅडर मिळाला. उदय कृष्ण रेड्डीची कथा आपल्याला शिकवते की, जीवनात अपमान, अडचणी किंवा अपयश येऊ शकते, पण जर आपण स्वतः हार मानली नाही तर यश आपल्याला नक्की मिळते. त्यांच्या हौसल्याने आणि कठोर परिश्रमाने लाखो युवकांसाठी प्रेरणा निर्माण झाली आहे.