फोटो सौजन्य - Social Media
NHPC Limited (भारत सरकारची नवरत्न कंपनी) ने भरतीला सुरुवात केली होती. या भरतीच्या माध्यमातून Non-Executive पदे भरण्यात येणार आहेत. एकूण २४८ रिक्त जागांना या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करायचे आहे. आज या भरतीसाठी शेवटची तारीख आहे. त्यामुळे कसलाही वेळ न घालवता या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज करण्यासाठी nhpcindia.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्या. जाहिरात क्रमांक NH/Rectt./04/2025 मध्ये ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
२ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज सुरु करण्यास प्रारंभ झाला होता. १ ऑक्टोबर म्हणजे आज या भरतीचा शेवट झाला आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे बंधनकारक आहे. General / OBC / EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹708/- रुपये भरावे लागणार आहेत. SC / ST / PwBD / Ex-Servicemen या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भारत येणार आहे.
NHPC लिमिटेडने Non-Executive पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांचा समावेश असून एकूण 248 पदे उपलब्ध आहेत. यामध्ये Assistant Rajbhasha Officer साठी 11 पदे राखीव असून उमेदवारांकडे इंग्रजी किंवा हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. Junior Engineer (Civil) या गटात सर्वाधिक 109 पदे आहेत तर Junior Engineer (Electrical) साठी 46 पदे, Junior Engineer (Mechanical) साठी 49 पदे आणि Junior Engineer (Electronics & Communication) साठी 17 पदे आहेत.
या सर्व पदांसाठी संबंधित शाखेतील डिप्लोमा किमान 60% गुणांसह आवश्यक आहे. याशिवाय, Senior Accountant पदासाठी 10 जागा असून उमेदवारांनी Inter CA किंवा Inter CMA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Supervisor (IT) या पदासाठी 1 जागा असून BCA, B.Sc (IT) किंवा संगणक विषयातील डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल, मात्र किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच Hindi Translator साठी 5 पदे उपलब्ध आहेत, ज्यासाठी इंग्रजी/हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.