Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,”IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000…”

केरला मध्ये राहणारी रेणू राज अनेक परिश्रमांनी आज आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिचा हा संघर्षमय प्रवास जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 20, 2025 | 08:00 PM
Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,"IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000..."

Success Story of Renu Raj: UPSC साठी सोडली डॉक्टरी! रेणू म्हणते,"IAS ऑफिसर बनून एकाच वेळी 1000..."

Follow Us
Follow Us:

युनियन पब्लिक सर्विस कमिशन म्हणजेच UPSC! देशभरात अनेक तरुण असे आहेत जे दिवस रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले आहेत, त्यातील काही या परीक्षेला अपात्र करत पुन्हा त्या परीक्षेला पात्र करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर काहीजण अशी आहेत जे अगदी पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेला पात्र करतात. त्यातलीच एक हुशार अशी उमेदवार जी आता स्वतः आयएएस ऑफिसर आहे ती म्हणजे केरळाची रेणू राज!

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली रेणू दिवस-रात्र कष्ट करत यूपीएससी परीक्षेत पात्र ठरली आहे. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे रेणूने त्यासाठी डॉक्टरीही सोडून दिली. एकाग्रतेने स्पर्धा परीक्षेची तयारी करत तिने अगदी पहिल्याच प्रयत्नात दुसऱ्या रँकने परीक्षेला पात्र केले. रेणू मूळची केरळची! तिचे वडील बस कंडक्टर होते तर आई गृहिणी होती. घरची आर्थिक परिस्थिती फार काही उत्तम नव्हती. तरी तिच्या पालकांनी तिच्या शिक्षणात कसलीही कमतरता येऊ दिली नाही. रेणूचे सुरुवातीचे शिक्षण सेंट टेरेसा हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. नंतर तिने एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसची डिग्री घेतली. त्यानंतर ती ASI हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून नोकरी करत होती.

पण सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवतानाच रेणू राजने आपल्या आयुष्याचा आणखी एक मोठा ध्यास ठेवल्याचं दिसून येतं. डॉक्टर म्हणून कार्यरत असताना तिने समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगली. रुग्णांची सेवा करताना तिला जाणवले की, आरोग्यसेवेबरोबरच समाजाच्या इतरही अनेक समस्या आहेत ज्यावर काम करणं गरजेचं आहे. याच विचारातून तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

2014 मध्ये तिने कठोर मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पात्र केली. सर्जन असल्यामुळे आधीच ती फार व्यस्त होती. ती दररोज 6 ते 8 तास अभ्यासासाठी वेगळा वेळ काढत असे. अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास आणि कधीही हार न मानणारी वृत्ती यामुळेच तिच्या कष्टांना यश मिळालं. आज रेणू राज आयएएस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशीलता आणि प्रशासकीय जबाबदारी या दोन्हींचा संगम तिच्या कामात दिसून येतो. तिच्या यशोगाथेने देशभरातील हजारो तरुणांना प्रेरणा दिली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरली आहे. तिचा प्रवास हेच दाखवून देतो की, जर ध्येय स्पष्ट असेल आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले तर कोणताही मार्ग अवघड राहत नाही.

‘या’ जिल्ह्यातील शाळा आज आणि उद्या राहतील बंद; वाढत्या पावसाच्या जोराने स्थानिक प्रशासनाने घेतला निर्णय

Web Title: Success story of renu raj ias officer in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • education
  • inspiration
  • special story

संबंधित बातम्या

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर
1

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
2

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…

Youngest Genius: वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी कमाल! ३००० पुस्तके वाचणाऱ्या अर्जुनचा विधानसभेत होणार विशेष सन्मान!
3

Youngest Genius: वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी कमाल! ३००० पुस्तके वाचणाऱ्या अर्जुनचा विधानसभेत होणार विशेष सन्मान!

IIT Mandi Survey 2025: नोकरी नको, व्यवसाय हवा! भारतीय तरुणांच्या मानसिकतेत होतोय मोठा बदल
4

IIT Mandi Survey 2025: नोकरी नको, व्यवसाय हवा! भारतीय तरुणांच्या मानसिकतेत होतोय मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.