फोटो सौजन्य - Social Media
डेटा एंट्रीच्या कामामध्ये कौशल्य असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. डेटा एंट्रीच्या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. डेटा एंट्रीच्या कामात तरबेज असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. देशाच्या पर्यटन विभागामध्ये ही भरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. लवकरच या भरती प्रक्रियेला दिशा देण्यात येणार आहे. उमेदवारांच्या प्रतिक्षेला लवकरच पूर्णविराम मिळणार असून, भारताच्या पर्यटन विभागामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या तसेच डेटा एंट्रीच्या कामात कुशल असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : National Housing Bank भरतीसाठी तात्काळ करा अर्ज ! वयोमर्यादा 23 ते 35, पगार 78230 रुपये
भारताच्या पर्यटन विभागामध्ये डेटा एंट्रीच्या कामासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना १ ऑक्टोबरपासून अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या देशाच्या पर्यटन विभागामध्ये आयोजित होणार असलेल्या या भरतीविषयी जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी हा लेख संपूर्ण वाचून काढावा. तसेच, जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
दरम्यान, या भरती विषयक महत्वाची बाब अशी आहे कि, अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्जशुलजक आकारण्यात येणार नाही आहे. उमेदवारांना निश्चितपणे या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग मिळवण्यासाठी निशुल्क अर्ज करावे. महत्वाची बाब अशी आहे कि, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे. या अटी शर्ती अधिसूचनेत जाहीर करण्यात आली आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणाविषयक आहेत. तसेच एका ठरविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या वयोमर्यादेविषयक अटींनुसार, किमान १८ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल. वयावरील सूट पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. शैक्षणिक अटींनुसार, अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण हवे. दहावी डिग्री असणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : जगभरात साजरी होते दिवाळी ! भारतासहित ‘या’ देशांमध्येही दिवाळीनिमित्त शाळांना मिळते सुट्टी
या भरतीसाठी उमेदवारांना नियुक्तीची प्रक्रिया पात्र करावी लागणार आहे. ही निवड प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारांना लिखित परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे, तसेच नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा पात्र करावी लागणार आहे. तसेच उमेदवारांची टायपिंग स्पीड तपासण्यासाठी उमेदवारांची टेस्ट घेण्यात येईल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अधिसूचना अधिकृत संकेस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर त्यावर नजर टाकावी.