Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण क्षेत्रात करिअर करायचे आहे? ‘Teach For India’ फेलोशिपद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळणार..

Teach For India Fellowship application: 'टीच फॉर इंडिया' फेलोशिप २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. फ्रेशर्स आणि वर्किंग प्रोफेशनल्ससाठी हा २ वर्षांचा फुल-टाइम प्रोग्राम असून, यात मासिक स्टायपेंड आणि करिअरच्या अनेक संधी मिळतात.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 08, 2026 | 06:50 PM
teacher

teacher

Follow Us
Follow Us:

Teach For India Fellowship application: जर तुम्ही नुकतेच पदवीधर झाला असाल किंवा तरुण व्यावसायिक असाल आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट करिअरची संधी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ‘टीच फॉर इंडिया’ ने फेलोशिप २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. हा २ वर्षांचा फुल-टाइम ‘पेइंग’ प्रोग्राम आहे. यामध्ये तरुणांना देशातील नामवंत लीडर्स आणि शिक्षकांसोबत काम करण्याची आणि मुलांचे भविष्य घडवण्याची थेट संधी मिळते.

टीच फॉर इंडिया फेलोशिपसाठी बीएड पदवीची गरज नाही. टीच फॉर इंडियाच्या सीनियर डायरेक्टर तान्या अरोरा यांच्या मते, संस्था अशा तरुणांचा शोध घेत आहे जे केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि लीडरशिप यांसारखी २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करू शकतील. ही फेलोशिप पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट, सोशल सेक्टर आणि पॉलिसी मेकिंगशी संबंधित मोठ्या कंपन्यांमध्ये करिअरचे मार्ग खुले होतात.

टीच फॉर इंडिया फेलोशिप नक्की काय आहे?

हा एक २ वर्षांचा लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तरुणांना देशातील कमी उत्पन्न असलेल्या शाळांमध्ये फुल-टाइम शिक्षक म्हणून नियुक्ती मिळते. येथे केवळ अभ्यासक्रम शिकवायचा नसून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ८ ‘सी’ (क्रिटिकल थिंकिंग, क्युरिऑसिटी, करेज, कम्युनिकेशन इ.) वर काम करायचे असते. हा अनुभव तरुणांना भविष्यातील मोठ्या कॉर्पोरेट आणि सोशल लीडरशिप नोकऱ्यांसाठी तयार करतो.

पात्रता

शैक्षणिक पात्रता: देशातील किंवा परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणे अनिवार्य आहे.

फ्रेशर आणि अनुभवी: कॉलेजचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी, फ्रेश ग्रॅज्युएट्स आणि वर्किंग प्रोफेशनल्स देखील यासाठी पात्र आहेत.

इतर: इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व, शिकण्याची इच्छा आणि समाजात बदल घडवण्याची जिद्द असावी.

मिळणारे लाभ

मासिक स्टायपेंड: अंदाजे २०,००० ते २५,००० रुपये प्रति महिना.

घरभाडे भत्ता: जर तुम्हाला होमटाऊनबाहेर दुसऱ्या शहरात नियुक्त केले तर अतिरिक्त HRA भत्ता दिला जातो.

इतर लाभ: आरोग्य विमा, रजा भत्ता आणि राष्ट्रीय स्तराचे अनुभव प्रमाणपत्र.

निवड प्रक्रिया:

टीच फॉर इंडियाची निवड प्रक्रिया ३ टप्प्यांत पूर्ण होते:

१. ऑनलाइन अर्ज: वैयक्तिक माहिती आणि निबंध सबमिट करणे.
२. ऑनलाइन चाचणी/मुलाखत: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी असेसमेंट असते.
३. असेसमेंट सेंटर: १-ऑन-१ मुलाखत, गटचर्चा आणि एक छोटा टीचिंग डेमो.

NEET UG Counselling: नीटच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! अर्जातील चुका सुधारण्यासाठी ‘रजिस्ट्रेशन रिसेट’चा पर्याय सुरू..

करिअरच्या संधी

टीच फॉर इंडियाच्या १,५८० हून अधिक माजी विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुसार, ७९% पूर्व विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्या आणि संस्थांमध्ये लीडरशिप रोल मिळाले आहेत. फेलोशिप संपल्यानंतर McKinsey, BCG, Teach For All, नीती आयोग यांसारख्या मोठ्या एडटेक आणि एनजीओ कंपन्यांमध्ये प्लेसमेंटचे दरवाजे खुले होतात. इच्छुक उमेदवार teachforindia.org या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Study in UK: युकेमध्ये शिकण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्कॉलरशिपची पात्रता आणि अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या!

८ ‘सी’ (8 Cs) चा जादुई फॉर्म्युला

मुलांच्या विकासासाठी क्लासरूममध्ये ८ ‘सी’ वर काम करणे आवश्यक आहे. यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, क्युरिऑसिटी, करेज (साहस), कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन, कंपॅशन (करुणा) आणि कॉन्शियसनेस (चेतना) यांचा समावेश होतो. याच मॉडेलवर काम करून अनेक फेलोशिप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजात मोठे बदल घडवले आहेत.

Web Title: Teach for india fellowship 2026 application news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
2

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
3

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
4

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.