Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा भार! आता ‘स्कॉफ’ माहिती अपलोडिंगवरून शिक्षकांमध्ये नाराजी

राज्यातील शिक्षकांवर वाढत असलेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे नाराजी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘स्कॉफ’ अॅपद्वारे माहिती भरण्याची सक्ती केल्याने शिक्षक संतप्त झाले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2026 | 10:38 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शिक्षकांवर वाढत चाललेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘स्कॉफ’ अॅपद्वारे माहिती अपलोड करण्याची सक्ती करण्यात आल्याने शिक्षक संतप्त झाले आहेत. “आम्ही शिकवू की अशैक्षणिक कामे करू?” असा थेट सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत असून, अध्यापनाच्या कामावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुलांच्या Social Media वापराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांमध्ये आता ‘डिजिटल सेफ्टी’चे धडे?

‘स्कॉफ’ अॅपमध्ये माहिती भरण्यासाठी शिक्षकांना स्वतःचा मोबाईल आणि इंटरनेट डेटा वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. “मोबाईल माझा, डेटा माझा आणि शासनाचा त्यात काहीही वाटा नाही,” अशी भूमिका घेत शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेही या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निपुण चाचणीपासून सुरू झालेली मोबाईल वापराची सक्ती आता ‘स्कॉफ’ अॅपपर्यंत पोहोचली आहे. शिक्षकांना विविध अॅप्स डाउनलोड करून त्यावर काम करावे लागत असून, गुगल ड्राईव्हवर फोटो अपलोड करणे, त्याच्या लिंक तयार करणे, तसेच १२८ प्रकारच्या प्रश्नांची माहिती व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे अशी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. या सर्व प्रक्रियेमुळे वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. शिक्षकांच्या मते, वैयक्तिक मोबाईलमध्ये बँकिंग, कौटुंबिक आणि इतर संवेदनशील माहिती साठवलेली असते. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध अॅप्सचा सक्तीने वापर करणे हे गोपनीयतेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. याशिवाय, ऑनलाईन कामासाठी लागणारा डेटा खर्च, तांत्रिक सुविधा आणि साधनसामग्री शासनाकडून उपलब्ध करून दिली जात नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे.

महाराष्ट्र TET 2026 परीक्षा कधी होणार? कधीपर्यंत भरता येईल फॉर्म? जाणून घ्या

शाळा स्तरावर उपलब्ध असलेले पुरावे प्रत्यक्ष तपासणीद्वारे पडताळता येत असताना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यामागील उद्देश काय, असा सवालही शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. ऑनलाईन कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे सांगत, “दादागिरी सहन केली जाणार नाही,” असा इशारा उदय शिंदे, विजय कोंबे आणि राजन कोरगांवकर यांनी दिला आहे. एकूणच, ‘स्कॉफ’ अॅपच्या सक्तीमुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढला असून, लवकरात लवकर यावर तोडगा न काढल्यास राज्यभर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: The burden of non academic tasks on teachers resentment among teachers over scof data uploading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा
1

NEET UG Exam: नीट परीक्षेच्या पद्धतीत होणार मोठा बदल? पेन-पेपर ऐवजी ऑनलाइन होणार परीक्षा

Student Suicide News: देशभरात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या ‘या’ राज्यात , गेल्या १० वर्षांतील आकडेवारी समोर
2

Student Suicide News: देशभरात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या ‘या’ राज्यात , गेल्या १० वर्षांतील आकडेवारी समोर

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
3

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
4

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.