Medical Seats Increased: वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि त्याची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये आता १०,०२३ नवीन जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५,०२३ एमबीबीएस (MBBS) जागा, तर नीट उत्तीर्ण होऊन पदवी शिक्षण (PG) घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ५,००० जागांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र पुरस्कृत योजनेच्या (CSS) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे विद्यमान सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचे बळकटीकरण व श्रेणीकरण केले जाईल. यामुळे ५,००० पदव्युत्तर (PG) जागा आणि ५,०२३ एमबीबीएस (MBBS) जागा वाढवणे शक्य होणार आहे.
It is Modi Ji’s resolve to make healthcare accessible to all. Under this vision the Union Cabinet today approved the increase of 10,023 seats in medical education at PG and MBBS levels. The rise in the number of seats will advance the goal of providing adequate doctors across the… pic.twitter.com/fjv5GaEigS — Amit Shah (@AmitShah) September 24, 2025
या उपक्रमाने एमबीबीएस आणि पीजी जागांमध्ये लक्षणीय वाढ होईल, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढेल. यामुळे देशातील आरोग्य सेवा मजबूत होईल. या दोन्ही योजनांवर २०२५-२६ ते २०२८-२९ या कालावधीसाठी १५,०३४.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे, ज्यापैकी केंद्रीय हिस्सा १०,३०३.२० कोटी रुपये आणि राज्यांचा हिस्सा ४,७३१.३० कोटी रुपये असेल.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या योजनांचे उद्दिष्ट २०२८-२९ पर्यंत सरकारी संस्थांमध्ये ५,००० पीजी आणि ५,०२३ यूजी जागा वाढवणे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे या योजनांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील. सध्या, देशात ८०८ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, जी जगात सर्वाधिक असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता १,२३,७०० एमबीबीएस जागांची आहे.
वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली 3 लाखांची फसवणूक; बिहारसह झारखंडच्या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल
गेल्या दशकात ६९,३५२ पेक्षा जास्त नवीन एमबीबीएस जागांची वाढ झाली असून, यात १२७% ची वाढ नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे, याच काळात ४३,०४१ पीजी जागा वाढल्या आहेत, ज्यात १४३% ची प्रभावी वाढ झाली आहे. या उल्लेखनीय वाढीनंतरही काही क्षेत्रांमध्ये आरोग्य सेवांची मागणी पूर्ण करण्यासाठी जागा वाढवण्याची आवश्यकता आहे.