फोटो सौजन्य - Social Media
पुणे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इंडक्शन प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कुलप्रती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी नव्या विद्यार्थ्यांचं स्वागत करत, कौशल्य आधारित शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला.
त्यांनी सांगितलं की, SSPU मध्ये ७०% प्रॅक्टिकल आणि ३०% थिअरी आधारित अभ्यासक्रम असून, यामुळे विद्यार्थ्यांना १००% नोकरीची संधी मिळते. विद्यापीठाला NIRF रँकिंगही प्राप्त आहे. विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष इंटर्नशिपची संधी मिळते, तसेच इंटरडिसिप्लिनरी लर्निंगमुळे त्यांची सर्जनशीलता आणि कौशल्य विकसित होतात. याशिवाय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबतच्या भागीदारीतून जागतिक करिअर संधी उपलब्ध होतात.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी अथर्व राजे आणि सोहम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या यशाचा अनुभव सांगताना सांगितलं की, SSPU मधून शिकलेली कौशल्यं त्यांनी प्रत्यक्ष व्यवसायात वापरून यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे.
ब्रिगेडियर वीरेश, RTN संचालक, दक्षिण कमांड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी सांगितलं की, कॉलेज ही यशाच्या प्रवासाची सुरुवात आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवे मार्ग शोधण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त आणि आत्मविश्वासाच्या महत्त्वावर भर दिला.
सुशील कुमार, ग्लोबल हेड आणि व्हाइस प्रेसिडेंट, टाटा टेक्नॉलॉजीज यांनी विद्यार्थ्यांना चार वर्षे म्हणजे भविष्य घडवण्याची संधी असल्याचं सांगत, एखाद्या विषयात खोल अभ्यास करून स्वतःचं कौशल्य प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं.
हा इंडक्शन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी नवी उमेद, नवे विचार आणि करिअरच्या दृष्टीने दिशादर्शक ठरला. SSPU चं कौशल्याधारित शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सज्ज करत आहे.