Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकिंग क्षेत्रातील IBPS प्रिलिम्स परीक्षेचा निकाल होणार जाहीर! अशा प्रकारे करता येईल चेक

IBPS PO/MT प्रिलिम्स परीक्षा 2025 चा निकाल लवकरच जाहीर होणार असून हजारो उमेदवार याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यावर उमेदवारांनी ibps.in वर जाऊन आपले स्कोअरकार्ड डाउनलोड करावे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 18, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) कडून PO/MT प्राथमिक (प्रिलिम्स) परीक्षा 2025 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक उमेदवार या वर्षी मोठ्या संख्येने बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याच्या उद्देशाने IBPS परीक्षेला पात्र करण्याच्या तयारीत आहेत. देशभरातील हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट, २३ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेत एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न होते, ज्यांना १०० गुणांची मर्यादा होती. इंग्रजी भाषा ( (English language), परिमाणात्मक क्षमता (quantitative ability) आणि तार्किक क्षमता (logical ability) असे तीन विभाग यात समाविष्ट होते.

दृष्टी नसली तरी इच्छाशक्ती होती! मनूने जे केलं ते पाहून अनेकांना मिळाली प्रेरणा

प्रत्येक विभागात उमेदवारांनी किमान गुण मिळवणे आवश्यक आहे, तेव्हाच त्यांना ऑनलाईन मुख्य परीक्षा (Mains) देण्याची पात्रता मिळते. या परीक्षेतील निवड पद्धती अत्यंत कठीण असल्यामुळे केवळ वेग, अचूकता आणि संकल्पनांची स्पष्टता असणारे उमेदवारच पुढील टप्प्यात पोहोचू शकतात.

IBPS ने यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. त्यामुळे प्रश्न सोडवताना उमेदवारांनी काळजीपूर्वक विचार करून उत्तर द्यावे लागले. यामुळेच ही परीक्षा आणखी आव्हानात्मक ठरली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी आपले स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:

  1. अधिकृत संकेतस्थळ ibps.in ला भेट द्या.
  2. “IBPS PO/MT Prelims Result 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. नोंदणी क्रमांक/रोल नंबर व पासवर्ड/जन्मतारीख टाका.
  4. सबमिट/लॉगिन केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल.
  5. आपले गुण आणि पात्रतेची स्थिती तपासा.
  6. निकाल डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करा.
  7. इच्छित असल्यास हार्ड कॉपी प्रिंट काढा.

अभियांत्रिकी क्षेत्रात डिप्लोमा उमेदवारांना मोठा त्रास! पदवी शिक्षणात प्रवेश घेताना अडचणीचा सामना

उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, निकालासंबंधी आणि पुढील मुख्य परीक्षा प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.

या निकालामुळे अनेक उमेदवारांच्या बँकिंग करिअरचा पुढील टप्पा निश्चित होणार असून, यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी सज्ज व्हावे लागणार आहे.

Web Title: The results of the ibps prelims exam in the banking sector will be announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.