फोटो सौजन्य - Social Media
IAS अधिकारी मनू गर्ग यांची यशोगाथा ऐकून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अनेकांची इच्छाशक्ती दृढ झाली आहे. मुळात, मनू यांची दृष्टी इतकी वाईट आहे की त्यांना फार काही दिसत नाही. शाळेत असतानाच त्यांच्या डोळ्यांना त्रास झाला होता. हा त्रास इतका वाढत गेला की त्यांना दिसणंच बंद झालं. तरीही त्यांनी अभ्यासात कधी हार मानली नाही. अभ्यासात कधी जिद्द सोडली नाही. प्रयत्न करत गेले, प्रत्येक स्थितीशी लढत गेले. मनू आज जे काही आहे त्यामागे त्याच्या आईचा फार मोठा हात आहे.
मनू दृष्टीने फार उत्तम नाही. तो अभ्यासात पूर्णपणे आवाजावर निर्भर होता. त्याला एखादे पुस्तक वाचणे कठीण होते, त्यावेळी त्याच्या आईने त्याच्या अभ्यासात हातभार लावला. अनेक तास त्याच्यासोबत त्याचा अभ्यास घेत आई बसलेली असायची. त्याच्या अभ्यासाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या आईने स्वतःच्या खांद्यावर घेतली. आई सगळी पुस्तके त्याला वाचवून दाखवयाची, समजवायची आणि पाठांतर करून घ्यायची. त्याच्या मित्रांनीही त्याला फार मदत केली. त्याला सगळे नोट्स पुरवण्याचे काम त्याचे मित्र करत होते.
मनू पहिल्या प्रयत्नात तर IAS झाला नाही. त्याने आधी परीक्षा दिली त्यात प्रिलिम्स पार केले पण मुख्य परीक्षेत त्याचा नेम काही लागला नाही. पण त्याने हार न मानता, पुन्हा प्रयत्न केले. २०२४ मध्ये ४१ व्या रँकने मनू IAS बनला. या दरम्यान, मुलाखतीत त्याने त्याच्या आईविषयी सांगितले. तिचे उपकार फार असल्याचे सांगत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. मनूची ही जिद्द आणि परिश्रम, देशातीलच नव्हे जगातील प्रत्यके तरुणांसाठी आदर्श आहे. अगदी वयाच्या २३ वर्षात, मनू इतक्या मोठ्या पदावर जाऊन ठेपला आहे. लाल दिव्याची गाडी आहे. त्याचसह देशाची जबाबदारी आता खांद्यावर आहे. त्याच्या या कर्तुत्वाला नक्कीच एक सॅल्यूट..