फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यदलात काम करण्याची इच्छास असणाऱ्या खेळाडू उमेदवारांसाठी आनांदाची बातमी आहे. हवालदार तसेच नायब सुभेदाराच्या पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. स्त्री तसेच पुरुष दोघांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, अर्ज कर्त्या उमेदवाराचे विवाह झाले नसावे. एकंदरीत, अविवाहित उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. स्पोर्ट्स कोटासाठी हि भरती आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. मुळात, या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज नोंदवला आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्तीचे पालन करावे लागत आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नमूद अटी शर्तींनुसार, अर्ज करता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून किमान SSC उत्तीर्ण असावा. तसेच एका ठरविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय १७.५ निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, अर्ज करण्यासाठी उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे. तर हि भरती विशेष करून खेळाडू कोट्यासाठी असल्यामुळे अर्ज करता उमेदवार खेलो इंडिया गेम्स, युथ गेम्स तसेच युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मेडेलिस्ट असणे अनिवार्य आहे. तसेच खेळाडूने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ खेळले असावे.
भारतीय सेना स्पोर्ट्स कोटा भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वरून अर्ज डाउनलोड करा. अर्ज A4 साईज पेपरवर दिलेल्या नमुन्यानुसार भरा. अर्जासोबत स्वसाक्षांकित पासपोर्ट आकाराची 20 छायाचित्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, क्रीडा क्षेत्रातील उपलब्धींची प्रमाणपत्रे, रहिवासी, जात व धर्म प्रमाणपत्रे, तसेच चारित्र्य व अविवाहित प्रमाणपत्र जोडा.
भरलेला अर्ज व कागदपत्रे खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवा:
संचालनालय पीटी आणि क्रीडा, जनरल स्टाफ शाखा, संरक्षण मंत्रालय (सेना) मुख्यालय, कक्ष क्र. 747, ‘अ’ विंग, सेना भवन,
पोस्ट ऑफिस: नवी दिल्ली – 110011.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.