Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

राज्यातील दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील सुमारे दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, यासाठी अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (कौशल्य विभाग) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत प्रत्यक्ष आपत्तीच्या प्रसंगी काम करण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे.

आपत्ती आली तरी घाबरू नका! ‘दोन लाख विद्यार्थ्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची संकल्पना

मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले की, आपत्ती ही कधीही आणि कुठेही उद्भवू शकते. ती नैसर्गिक असो—जसे पूर, भूकंप, चक्रीवादळ—किंवा मानवनिर्मित असो, अशा वेळी तत्काळ आणि शिस्तबद्ध प्रतिसाद देणारी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. युवकांमध्ये ऊर्जा, धाडस आणि कार्यक्षमता असते. योग्य प्रशिक्षण दिल्यास हेच युवक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला प्रभावी सहकार्य करू शकतात. जनसेवेच्या भावनेतून देशसेवेसाठी सज्ज असलेली युवा पिढी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी सांगितले की, राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये हे प्रशिक्षण विनाशुल्क दिले जाणार आहे. प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांना विशेष महत्त्व दिले जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीत काम करण्याचा अनुभव मिळेल. शहरी आणि ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. प्राथमिक उपचार, बचावकार्य, आपत्कालीन प्रतिसाद, सुरक्षित स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना आणि समन्वय कौशल्ये यांचा समावेश प्रशिक्षणात असेल.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी नमूद केले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच आपत्तींचे स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे आधुनिक आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नव्या पिढीसाठी अत्यावश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित होईल.

SSC HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स! कशी करावी तयारी? जाणून घ्या 

या सामंजस्य करारामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यांसोबतच मानवी मूल्यांची जोड मिळणार आहे. आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने मदत करणारी, प्रशिक्षित आणि सजग युवा पिढी घडविण्याकडे हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Web Title: Two lakh iti students to be trained in disaster management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • ITI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.