CAREER (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
UGC NET Result 2025: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET जून २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा २५ ते २९ जून २०२५ दरम्यान देशभरातील २८५ शहरांमध्ये १० शिफ्टमध्ये घेण्यात आली. हि परीक्षा जेआरएफ आणि असिस्टंट प्रोफेसर, पीएचडी प्रवेशासाठी दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेसाठी १० लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. चला जाणून घेऊया हा निकाल कसा बघता येईल आणि विषयवार कटऑफ काय आहे?
CLAT 2026 चे वाजले बिगुल! कॉमन लॉ ची प्रवेशप्रक्रिया परीक्षेची फायनल तारीख, ‘या’ दिवसापासून अर्ज
किती % लोकांनी दिले परीक्षा?
यावर्षी यूजीसी नेट जून 2025 परीक्षा एकूण 10,19,751 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,52,007 उमेदवारांनी पेक्षा दिली. म्हणजेच एकूण ७३.८% उमेदवारांनी परीक्षा दिले. ही परीक्षा ८५ विषयांसाठी घेण्यात आली होती जे ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF), असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडीमध्ये प्रवेशासाठी पात्रता निश्चित करतात.
किती लोक झाले उत्तीर्ण?
जेआरएफ आणि असिस्टंट प्रोफेसर या दोन्ही पदांसाठी 5,269 उमेदवार यशस्वी उत्तीर्ण झाले. असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रवेशासाठी एकूण 54,885 उमेदवार पात्र घोषित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे 1,28,179 उमेदवारांनी पीएचडी प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एकूण 1,88,333 उमेदवार वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पात्र ठरले आहेत.
कटऑफ काय?
एनटीएने निकालासह , उत्तर पत्रिका आणि विषयावर श्रेणीवार कटऑफ जाहीर केले आहेत. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना किमान ४०% गुण आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांना ३५% गुण प्राप्त करायचे होते. अंतिम उत्तरपत्रिका (फाइनल आंसर की) वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्याला उम्मीदवर डाउनलोड करू शकतो.
कुठे बघता येईल निकाल?
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET जून २०२५ या परीक्षेचा निकाल उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता. तुम्ही
स्कोअरकार्ड आणि अंतिम उत्तर की डाउनलोड करू शकतात.
कसे कराल डाउनलोड?
ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर होमपेजवर असलेल्या UGC NET June 2025 Scorecard लिंकवर क्लिक करा.
तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
तुमचा स्कोअरकार्ड स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
तुम्ही तुमचा स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.